New Facebook Update: फेसबूकमध्ये येणार नवा अपडेट, प्रोफाइलवरुन हटवण्यात येणार 'या' महत्वाच्या गोष्टी
Facebook | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

फेसबूक (Facebook) आपल्या वापरकर्त्यांसाठी (Facebook User) एक महत्वपूर्ण अपडेट (Update) घेवून येत आहे. या अपडेटनुसार तुमच्या फेसबूक प्रोफाइलमध्ये (Facebook Profile) मोठे बदल बघायला मिळणार आहे. तरी तुम्ही फेसबूक वापरकर्ते (Facebook User) असाल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे. हा नवा अपडेट 1 डिसेंबरपासून अप्लाय होणार असुन या अपडेनुसार फेसबूकच्या प्रोफाईलवरुन काही महत्वपूर्ण गोष्टी हटवण्यात येणार आहे. तरी फेसबूकडून हा नवा अपडेट (Facebook New Update) का लॉंच (launch) करण्यात आला या मागचा उद्देश अजून तरी स्पष्ट झालेला नाही. तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर (Interested In), धार्मिक विचार (Religious View), पत्ते (Address) आणि राजकीय विचार (Political Views) यासारख्या गोष्टी दिसणार नाहीत.

 

सध्या तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर तुमची शाळा (School), कॉलेज (College), नोकरीचं ठिकाण (Working), तुमच मुळगाव, तुम्ही हल्ली कुठल्या शहरात असता (current City), मोबाईल नंबर (Mobile Number), ईमेल अडरेस (Email), लिंग (Gender), जन्मतारीख (Date Of Birthday), इन्टरेंस्टेड इन (Internet In), रिलेशनशीप स्टेटस (Relationship Status) यासारख्या गोष्टी अड कराव्या लागतात. किंबहुना त्यातील कुठल्या गोष्टी पब्लिक ठेवायच्या कुठल्या गोष्टी फ्रेन्डस तर कुठल्या गोष्टी प्रायवेट याबाब तुम्ही ठरवू शकता. त्याप्रकारची सेटींग करण्याची तुम्हाला मुभा असते पण यांत आता खुद्द फएसबूक कडूनचं मोठे बदल करण्यात आले आहेत. (हे ही वाचा:- Twitter Suspended Account: एलॉन मस्कचा ट्विटर सस्पेंडेड अकाउंटबाबत मोठा निर्णय! अमेरीकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प ट्विटरवर कमबॅक तर कंगणाचं ट्विटर अकाउंटही..)

 

सध्या तरी फेसबूक (Facebook) म्हणजेच मेटा (Meta) कडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सोशल मीडिया (Social Media) कन्सल्टंट मॅट नवरा (Matt Navarra) यांनी याबाबत ट्विट करत या बदलांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. यांत त्यांनी फेसबूक इंटरेस्टेड इन (Interest In) आणि रिलेजीअस व्हूव्ह (Religious View) 1 डिसेंबर पासून काढून टाकणार असल्याची माहिती दिली आहे.