Motorola कंपनीने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 2019 लॉन्च केला आहे. कंपनीच्या इतर स्मार्टफोनच्या तुलनेत हे मॉडेल काहीसे वेगळे आहे. कंपनीने हा स्मार्टफोनमध्ये फोल्डेबल डिस्प्ले डिजाईनससोबत लॉन्च केला आहे. गेल्या काही काळात लॉन्च झालेल्या मोटोरोलाच्या इतर स्मार्टफोनपेक्षा हा फोन बराच वेगळा आहे. हा फोन वर्टिकली फोल्ड होतो. कंपनीने फर्स्ट जनरेशन मोटो रेजर विचारात घेऊन हे डिजाईन बनवल्याचे समजते. हा फोन अमेरिकेतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. मोटो रेजर 2019 ची किंमत अमेरिकेत 1419 डॉलर इतकी आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, फिचर्स आणि किमती आदिंविषयी.
स्क्रिन
- मोटो रेजर 2019 डबल स्क्रीन सोबत उपलब्ध आहे.
- फोनची एक स्क्रीन आतल्या तर दुसरी स्क्रिन पाहेरच्या बाजूला आहे.
- अनफोल्डेड कंडिशनमध्ये आतल्या बाजूची स्क्रिन साईज 6.2 इंच इतकी होते.
- ही स्क्रिन फ्लेक्सिबल OLED इंटरनल डिस्प्ले 21:9 सिनेमाविजन आस्पेक्ट रेशोसोबत येते.
- फोन फोल्ड झाल्यावर बाहेरच्या बाजूची स्क्रिन 2.7 इतकी होते.
- या स्क्रिनवर आउटर डिस्प्ले यूजर्स को नोटिफिकेशन्स देईल.
- फोनला फिंगरप्रिंट सेंसर आउटर पॅनलवरच देण्यात आले आहे.
(हेही वाचा, Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात धडकणार; मोबाईलमध्ये असणार 5 पॉप-अप कॅमेरे)
मोटोरोला ट्विट
You’re gonna flip! #razr #bethefirst #motorolarazr #feeltheflip https://t.co/DNwV4xilfy pic.twitter.com/A44crUTPPw
— Motorola US (@MotorolaUS) November 14, 2019
कॅमेरा
- या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 2 कॅमेरे उपलब्ध आहेत.
- नाईट व्हिजन मोड सोबत 16 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमरा
- 5 मेगापिक्सल इतका इंटरनल कॅमरा देण्यात आला आहे.
सपोर्ट
- फोन अँण्ड्रईड 9 पाई आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो.
- महत्तवाचे म्हणजे हा फोन केवळ ई-सिम कार्ड सपोर्टेड आहे.
- फोनला 6GB रॅम आणि 128 GB इतके इंटरनल स्टोरेज आहे.
- प्रोसेसरबद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन स्नैपड्रैगन 710 चिपसेट उपलब्ध आहे.
कंपनीने फोन लॉन्चींग दरम्यान सांगितले की, मोटो रेजर 2019 जानेवारी 2020 पासून उपलब्ध होईल. अमेरिकेत फोनची प्री-बुकिंग डिसेंबर अखेरीस सुरु होईल. कंपनी हा फोन भारतातही लॉन्च करणार आहे. मात्र, हा फोन भारतात कधी लॉन्च होईल याबाबत मात्र कंपनीकडून माहिती मिळू शकली नाही. स्मार्टफोनच्या किमतीबाबत बोलायचे तर अमेरिकेत हा फोन 1499 डॉलर (भारतीय चलनात तब्बल 1,05,988 रुपये) इतक्या प्राइस टॅग सोबत लोन्च करण्यात आला आहे. बोलले जात आहे की, भारतात हा फो यापेक्षाही अधिक किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.