खुशखबर! केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 7 तास चालेल मोबाईल बॅटरी; Motorola घेऊन येत आहे नवा One Vision, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
One Vision Phone (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या बाजारान अनेक फोन आले आहेत, येत आहेत मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत ते जास्त बॅटरी लाईफ (Battery Life) देणारे फोन. अशात आता भारतात फक्त 15 मिनिटात 7 तासांची बॅटरी देणारा फोन सादर होणार आहे. हा फोन आहे मोटोरोला (Motorola) कंपनीचा वन व्हिजन (One Vision). या फोनची विक्री फ्लिपकार्टवर (Flipkart) होणार आहे. मोटोरोला इंडिया (Motorola India) ने काही दिवसांपूर्वी आपण एक प्रीमियम उपकरण बाजारात आणत असल्याचे सांगितले होते. आता हे प्रीमियम डिव्हाईस 'वन व्हिजन' फोन असल्याचे समोर येत आहे. 20 जून रोजी भारतामध्ये हा फोन सादर केला जाईल.

मोटोरोला वन व्हिजनचे होल-पंच डिझाइन आहे. मागील भागावर उभ्या स्थितीत दोन रियर कॅमेरे दिले आहेत. मागच्या भागावर फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे. हा हँडसेट ग्लॉसी ग्रेडिएंट फिनिशमध्ये आहे. हाइब्रिड-ड्युअल सिम असलेला हा फोन Android One प्रोग्रामचा भाग आहे. मोटोरोलाने आपल्या वन व्हिजनमध्ये 6.3 इंचाचा पूर्ण एचडी+ (1080x2520 पिक्सल) डिस्प्ले दिलेला आहे. या हँडसेट मध्ये 2.2 गीगाहर्ट्ज एक्सीनॉस 9609 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम दिले आहेत आणि इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे. आवश्यक असल्यास 512 जीबी पर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणे शक्य आहे.

मोटोरोलाने वन व्हिजन मध्ये मागील भागात एफ/1.7 अपर्चरवाला 48 मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे. फोनमध्ये ड्युअल-एलईडी फ्लॅश, 8x डिजिटल झूम, पोर्ट्रेट मोड, मॅन्युअल मोड, सिनेमाग्राफ, पॅनोरमा आणि ऑटो एचडीआर यांसारखी फीचर्स आहेत. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चरचा 25 मेगापिक्सल कॅमेरा आहे. (हेही वाचा: Xiaomi Mi Band 4 लवकरच भारतीय बाजारात विक्रीसाठी होणार उपलब्ध)

आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी (Battery), मोटोरोलाच्या वन व्हिजनची बॅटरी 3,500 एमएचएच आहे आणि ही टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. म्हणजेच फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हा फोन तब्बल 7 तास चालू शकतो. कनेक्टिव्हिटी फीचर मध्ये ब्लूटूथ 5, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, एनएफसी, जीपीएस, ए-जीपीएस आणि ग्लोनास यांचा समावेश आहे. या फोनचे डायमेन्शन 160.1x71.2x8.7 मिलीमीटर आहे आणि वजन 181 ग्रॅम आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 23,590 इतकी आहे.