Moto G8 Power Lite Smartphone Sale: आज दुपारी 12 पासून Flipkart वर सेलला सुरुवात; पहा फिचर्स, किंमत आणि ऑफर्स
Motorola Moto G8 Power Lite (Photo Credits: Flipkart)

Moto G8 Power Lite स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आहे. आज (16 जुलै) दुपारी 12 वाजता हा सेल फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरु होणार आहे. या सेल अंतर्गत स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तसंच अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Cards) आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड (Axis Bank Buzz Credit Cards) 5% अनलिमिडेट कॅशबॅक मिळत आहे. तसंच या सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) आणि सँडर्ट ईएमआयचा (Standard EMI) पर्याय देखील उपलब्ध आहे.

Moto G8 Power Lite या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD HD+ व्हाटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. यात MediaTek Helio P35 SoC चा प्रोसेसर असून 5,000mAh च्या बॅटरीसह 10W फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप दिला असून त्याची मेन लेन्स 16MP ची आहे. यात 2MP ची मॉक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स:

प्रोसेसर MediaTek Helio P35 SoC
रॅम 4GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 64GB
बॅटरी 5,000mAh
बॅक कॅमेरा 16MP, 2MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 8MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट

4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी या वेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ही मेमरी तुम्ही 256GB पर्यंत वाढवू शकता. तसंच हा स्मार्टफोन अॅनरॉईड 9 पाय या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा मोबाईल रॉयल ब्लू (Royal Blue)आणि अॅक्रटीक ब्लू (Arctic Blue) या दोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेल्या या मोबाईलची किंमत 9,499 रुपये इतकी आहे.