ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Moto G8 Plus लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
Moto G8 Plus(Photo Credits-Twitter)

मोटोरोला कंपनीने मिड रेंज G-सिरिजमधील Moto G8 Plus नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. याची खासियत म्हणजे त्यामध्ये डेडिकेटेड अॅक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. यामध्ये केवळ 4GB+64GB च्या सिंगल वेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल पिंक रंगामध्ये खरेदी करता येणार आहे.

या नव्या मोटोरोलाची खरेदी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी करता येणार आहे. Moto G8 Plus वर जिओकडून 2200 रुपयांचा कॅशबॅक, 3 हजार रुपयांचा क्लिअरट्रिप वाउचर आणि 2 हजार रुपयांचे झूम कारचे वाउचर मिळणार आहे. मोटोच्या स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास त्यासाठी 6.3 इंच फुल HD सह IPS LCD डिस्प्ले अॅक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5mp डेप्थ सेंसर सुद्धा देण्यात आला आहे.(Amazon दिवाळी सेलमध्ये बंपर सूट, 999 अवघ्या रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार 'हे' पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट्स)

Moto G8 Plus च्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48Mp चा आहे. त्याचसोबत 16Mp डेडिकेटेड अॅक्शन कॅमेरा आणि 5MP डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. सेल्फीसाठी f/22 अॅपरेचरसोबत 25Mp कॅमेरा दिला आहे.कॅमेऱ्यामध्ये डेडिकेटेड नाइट मोड सुद्धा देण्यात आला आहे.तसेच इंटरनल मेमोरी 64GB असून ती 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. कनेक्टिव्हीटीसाठी त्यामध्ये 4G LET, ब्लूटूथ V5.0, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, क्वॉलकॉम aptX, GPS, A-GPS, GLONASS, Galileo, 3.5mm हेडफोन जॅक आणि एक USB टाइप C पोर्ट देण्यात आला आहे. त्याची बॅटरी 4,000mAh असून त्यामध्ये 15W टर्बोपावर चार्जर सुद्धा दिला आहे.