Amazon दिवाळी सेलमध्ये बंपर सूट, 999 अवघ्या रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार 'हे' पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट्स
(Photo Credits: PTI)

फेस्टिव्ह सीझनमध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसह अन्य ई-कॉमर्स वेबसाईटवर सणासुदीच्या काळात सेल लावले जातात. तर अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोन ते फॅनश ट्रेन्ड पर्यंतचे सर्व प्रोडक्ट्स ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये असे काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला सणासुदीच्या काळात अवघ्या 999 रुपयापर्यंत खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये अनेक गोष्टींवर भरघोस सूट मिळत आहे, मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणारी सूट ही या सेलचे मुख्य आकर्षण आहे. तसेच फ्लिपकार्टवरही बिग दिवाळी सेल सुरु झाला आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना शानदार स्मार्टफोनसह ऑफर्स सुद्धा खरेदीवर देण्यात येणर आहेत.

-PTron cosmo 2-in-1 jack

हे एक Two-In-One जॅक असून 3.5mm हेडफोन जॅक आणि टाइप-सी पोर्ट या दोन्हीचे काम करतो. याचा उपयोग USB Type-C सारख्या स्मार्टफोनसाठी केला जातो. त्याचसोबत ज्या युजर्सकडे 3.5 एमएम जॅक असलेल्यांना याचा फार उपयोग होणार आहे. याची मुळ किंमत 700 रुपये आहे. परंतु सेलमध्ये तुम्हाला हे फक्त 251 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

-Portronics POR-130 iTrack Tracker

हे एक ट्रॅकर असून त्याचा उपयोग कोणत्याही वस्तूला ट्रॅक करण्यासाठी केला जातो. याच्या माध्यमातून तुम्हाला स्मार्टफोन, किल्ली, सामान यांसारख्या अन्य गोष्टी ट्रॅक करता येणार आहेत. त्यानुसार तु्म्हाला त्या वस्तूचे लोकेशन सुद्धा दाखवले जाणार आहे. सेलमध्ये याची किंमत 499 रुपये लावण्यात आली आहे.

-LCD डिस्प्ले के साथ Running Alarm Clock

एका खास डिझाइनसह बनवण्यात आलेले अलार्म क्लॉक आहे. हे अलार्म क्लॉक वाजल्यावर वेगवेगळ्या दिशांना धावू लागते. तसेच 3 फुट उंचीवरुन सुद्धा हे क्लॉक उडी मारु शकते. अलार्म जो पर्यंत तुम्ही बंद करत नाहीत तो पर्यंत हे क्लॉक उड्या मारत राहणार आहे. सेलमध्ये याची किंमत 995 रुपये ठेवण्यात आली आहे.

-Portable Hand Free Fan

हे एक ब्लुटूथ हेडफोनच्या डिझाइनमधील फॅन आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूला फॅन लावण्यात आले असून ते 360 डिग्री पर्यंत फिरु शकणार आहेत. त्याचसोबत फॅनचा स्पीड सुद्धा तुम्हाला मॅनेज करता येणार आहे. 1200mAh बॅटरीच्या या फॅनला USB ने चार्ज करता येणार आहे. याची सेलमध्ये किंमत 489 रुपये आहे.

JERN LED Night Light Sensor 2 USB Charging Socket

हे एक युएसबी चार्जिंग सॉकेट आहे. जे एकसाथ दोन स्मार्टफोन चार्ज करण्याची सुविधा देते. त्यामध्ये रात्रीसाठी एलईडी लाईट सुद्धा देण्यात आली आहे. सेलमध्ये याची किंमत 649 रुपये ठेवण्यात आली आहे.(यंदाच्या दिवाळीला 10 हजार रुपयापर्यंच्या 'या' दमदार स्मार्टफोन खरेदीसह मिळवा शानदार ऑफर्स)

सेलदरम्यान स्मार्टफोनसह अन्य प्रोडक्ट्सवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच LED TVM DSLR, स्मार्टवॉच सारख्या प्रोडक्ट्सवर सुद्धा ऑफर्स मिळणार आहे. त्याचसोबत सेलवेळी सकाळी 12, 8 आणि दुपारी 4 वाजता धमाका डिल्स म्हणून ऑफर्स दिली जाणार आहे.