यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जर तुम्ही या दिवाळीला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास बाजार विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स दिल्या जात आहेत. त्याचसोबत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरही बिग दिवाळी सेल सुरु झाला आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना शानदार स्मार्टफोनसह ऑफर्स सुद्धा खरेदीवर देण्यात येणर आहेत.
फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या वेबसाईटवर सणाच्या दिवशी धमाकेदार सेल लावला जातो. त्यामध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक प्रोडक्ट्सपासून ते फॅनश ट्रेन्ड पर्यतच्या सर्व वस्तूंवर सूट देण्यात येते. तर या दिवाळीला तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असल्यास हे 10 हजारापर्यंतचे पॉकेटफ्रेंडली फोन खरेदी करता येणार आहेत.
-रेडमी नोट 7 प्रो
रेडमी कंपनीच्या या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 13,999 रुपये आहे. मात्र तुम्हाला सेल दरम्यान हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
-रेडमी नोट 7S
रेडमी नोट 7S स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर 10 ,999 रुपये किंमत लावण्यात आली आहे.मात्र सेल दरम्यान ग्राहकांना हा स्मार्टफोन 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह 8,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
-रियलमी 5
फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेलमध्ये हा स्मार्टफोन 8,999 रुपयांस खरेदी करता येणार आहे. मात्र सेलशिवाय या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
-वीवो Z1 प्रो
सेलदरम्यान वीवो Z1 प्रो हा स्मार्टफोन 12,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. परंतु सेल शिवाय फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 14,990 रुपये ठेवण्यात आली आहे.(Amazon Diwali Sale: अॅमेझॉनवर चालू आहे दिवाळी बंपर सेल; 500 रुपयांच्या आत खरेदी करा 'हे' पॉकेट फ्रेंडली गॅजेट्स)
सेलदरम्यान स्मार्टफोनसह अन्य प्रोडक्ट्सवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात
येणार आहे. तसेच LED TVM DSLR, स्मार्टवॉच सारख्या प्रोडक्ट्सवर सुद्धा ऑफर्स मिळणार आहे. त्याचसोबत सेलवेळी सकाळी 12, 8 आणि दुपारी 4 वाजता धमाका डिल्स म्हणून ऑफर्स दिली जाणार आहे.