Moto G40 Fusion (Photo Credits: Motorola India)

मोटोरोला इंडिया (Motorola India) ने दोन नवीन स्मार्टफोन्स गेल्या आठवड्यात सादर केले. Moto G60 आणि  Moto G40 असे हे दोन स्मार्टफोन्स आहेत. या दोन्ही फोन्सच्या स्पेसिफिकेशन्समध्ये बरेच साम्य आहे. त्यापैकी Moto G60 चा सेल या आठवड्यात पार पडला आणि आता Moto G40 Fusion स्मार्टफोनचा सेल उद्या (शनिवार, 1 मे) दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे बजेट स्मार्टफोन खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही अगदी चांगली संधी आहे. थेट उद्या दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट (Flipkart) वरुन तुम्ही हा फोन खरेदी करु शकता.

हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे- 4GB + 64GB आणि 6GB + 128GB. यात दोन रंग उपलब्ध आहेत- Dynamic Gray आणि Frosted Champagne. यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये इतकी होती आता याची किंमत 15,999 रुपये इतकी झाली आहे. मात्र लॉन्च ऑफर अंतर्गत ग्राहकांना सूट दिली जात आहे. आयसीआयसीआय बँक कार्ड वापरुन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. (Flipkart Big Saving Days: येत्या 1 मे पासून स्वतात खरेदी करता येणार 'हे' टॉप स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्ससह नवी किंमत)

Motorola India Tweet:

Moto G40 मध्ये 6.8 इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात octa-core Qualcomm Snapdragon 732G चिपसेट प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेस सह देण्यात आला आहे. ही मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 1TB पर्यंत वाढवू शकता.

फोटोज आणि व्हिडिओज साठी यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला असून 64MP प्रायमरी सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे, तर 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात 6,000mAh ची बॅटरी TurboPower 20 फास्ट चार्गिंग सपोर्ट सह दिली आहे.