Mobile Bonanza Sale: जबरदस्त ऑफर! फ्लिटपकार्टवर पोको एम2 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Poco M2 Pro Launched in India (Photo Credits: Poco India Official Twitter)

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिटपकार्टवर (Flipkart) 25 जानेवारीपासून मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) सुरू झाला असून 29 जानेवारी सेलचा अखेरचा दिवस असणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येत आहे. यातच पोको कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन पोको एम2 प्रो (Poco M2 Pro) कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च झाला होता. त्यावेळी बऱ्याच लोकांनी या स्मार्टफोनला पसंती दर्शवली होती. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करण्याची ईच्छा असणाऱ्या लोकांसाठी मोठी सूट दिली जात आहे.

पोको एम2 प्रो कंपनीच्या (4 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज) आणि (6 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज) या दोन व्हेरिएंटमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे. यातील 4 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 इतकी आहे. तर, 6 जीबी रॅम असलेला पोको एम2 प्रो ची किंमत 12 हजार 999 इतकी आहे. मात्र, फ्लिटपकार्टवर सुरु असलेल्या या सेलमध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर या दोन्ही स्मार्टफोनवर 1 हजारांचू सूट मिळणार आहे. हे देखील वाचा- Poco M3 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह भारतात होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स

पोको एम2 हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर अधारित काम करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67 इंचाचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पोको एम2 प्रोमध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोड सपोर्ट असलेला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन आउट ऑफ द ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि टू शेड्स ऑफ ब्लॅक अशा तीन कलरमध्ये खरेदी करता येणार आहे.