Mi Super Sale आजपासून सुरु; Redmi Note 7 Pro, Note 8 Pro यांसारख्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट
Mi Suber sale (Photo Credits: Mi Official Website)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने आपल्या अधिकृत वेबसाईट mi.com वर Mi Super Sale चे आयोजन केले आहे. हा सेल 11 मार्च पासून सुरु होत असून 18 मार्च पर्यंत चालू राहणार आहे. या सेल अंतर्गत Xiaomi च्या अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. त्यासोबतच काही खास ऑफर्सही देण्यात येत आहेत. Redmi Note 7 Pro, Redmi 8A Dual या स्मार्टफोन्सवर 6000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिले जात आहे. तसंच Mi Exchange च्या माध्यमातून 2000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. तर जाणून घेऊया सेलअंतर्गत मिळाणाऱ्या काही खास ऑफर्स...

Redmi Note 7 Pro:

या स्मार्टफोनवर 6000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये असून सेलअंतर्गत हा फोन 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये असून सेलमध्ये हा फोन केवळ 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. Redmi Note 7 Pro च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये असून हा फोन तुम्हाला 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. या वेरिएंटवर 1,000 रुपयांची Mi Exchange ऑफर देखील दिली जात आहे. याशिवाय फोनमध्ये No Cost EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. एक्सीडेंटल आणि लिक्वीड डॅमेज प्रोटेक्शनसह हा फोन खरेदी करता येईल. मात्र प्रोटेक्शन प्लॅनची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. हा फोन नेप्ट्यून ब्लू, स्पेस ब्लॅक आणि नेबुला रेड या रंगात उपलब्ध आहे.

Redmi Note 8 Pro:

या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये असून या सेलमध्ये तुम्हाला तो केवळ 13,999 रुपयात उपलब्ध आहे. तर या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये असून सेलमध्ये तो फोन 15,999 रुपयांना खरेदी करता येईल. Redmi Note 8 Pro च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंटची किंमत 19,999 रुपये असली तरी सेलमध्ये 17,999 रुपयांना हा फोन खरेदी करु शकाल. या वेरिएंटवर 1000 रुपयांची Mi Exchange ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये No Cost EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. एक्सीडेंटल आणि लिक्वीड डॅमेज प्रोटेक्शनसह हा फोन खरेदी करता येईल. मात्र प्रोटेक्शन प्लॅनची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. या फोनमध्ये शॅडो ब्लॅक, गामा ग्रीन, हेलो व्हाईट आणि इलेक्ट्रीक ब्लू हे रंग उपलब्ध आहेत.

Redmi Go:

या फोनच्या 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज वेरिएंटवर 1700 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. हा फोन तुम्हाला 5,999 रुपयांऐवजी 4,299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर याच्या 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज वेरिएंटवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. त्यामुळे फोनचे हे वेरिएंट तुम्ही 5,999 रुपयांऐवजी 4,499 रुपयांना खरेदी करु शकता. या फोनमध्ये एक्सीडेंटल आणि लिक्वीड डॅमेज प्रोटेक्शन देण्यात आले असून याची रक्कम मात्र तुम्हाला भरावी लागेल. या फोनमध्ये ब्लू आणि ब्लॅक हे दोनच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्ही जर यापैकी कोणता स्मार्टफोन खेरदी करण्याच्या विचारात असाल तर या सेलमधील ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी सोडू नका.