फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटाने बुधवारी आपल्या WhatsApp, Instagram आणि Facebook अशा सर्व प्लॅटफॉर्मवर 10,000 नोकर्या कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, कर्मचारी कपातीची नवीन फेरी सुरू केली. याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. कंपनी आता तिसऱ्यांदा छाटणीची प्रक्रिया सुरू करत आहे. यावेळी सुमारे 10,000 लोकांना कामावरून काढून टाकले जाईल. कोरोनाच्या काळात 2020 पासून कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली होती. या नियुक्तीनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली होती. आता कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहे. लिंक्डइनच्या माध्यमातून कंपनीने कर्मचाऱ्यांना या छाटणीबाबत नव्याने माहिती दिली आहे. मेटासोबत डिस्ने कंपनीही मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची तयारी करत आहे. (हेही वाचा: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioMart कडून टाळेबंदी, कंपनीने 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले)
Meta Layoffs Continue! Facebook Parent Company Begins Third Round of Job Cuts, Employees in Various Business Groups To Be Impacted, Says Report #MetaLayoffs #Meta #Layoffs https://t.co/Tw5o5FzJY2
— LatestLY (@latestly) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)