PAN-Aadhar Link: नवीन वर्षाला सुरुवात होण्याअगोदर अनेक नियमांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमचं पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत ते लिंक करणं बंधनकारक आहे. यासाठी आयकर विभागाने (Income Tax Department) 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत दिली आहे. आतापर्यंत अनेक वेळा आयकर विभागाने मुदत वाढवली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणी (PAN-Aadhar Link) करून घ्या, अन्यथा तुमचे पॅनकार्ड अवैध ठरू शकते. त्यामुळे लवकरात-लवकर पॅन-आधार जोडणी करून घ्या. तुम्ही अगदी घरात बसून पॅनकार्ड-आधारकार्डची जोडणी करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच SMS चा वापर करू शकता. 31 डिसेंबरपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डासोबत लिंक न केल्यास तुमचं पॅनकार्ड आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत अवैद्य होईल. त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं. (हेही वाचा - Aadhaar-PAN Linking: SMS आणि Login शिवाय अशा पद्धतीने करा आधार-पॅन कार्डला लिंक)
Building a better tomorrow!
To reap seamless benefits of income tax services, complete the vital link before 31st December, 2019.
🔗: https://t.co/psNUjIYyTj pic.twitter.com/KJCIHXjsew
— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 15, 2019
अशी करा पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक -
- तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पॅन-आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या (www.incometaxindiaefiling.gov.in) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या लिंकवर तुम्ही तुमचं पॅन-आधारकार्डची जोडणी करू शकता.
- या वेबसाइटवर तुम्हाला 'लिंक आधार' हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
- यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 'आधार कार्ड लिंक'चा पर्याय दिसेल.
- यावर आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड भरा.
- ही माहिती भरल्यानंतर 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलं जाईल.
याव्यतिरिक्त तुम्ही SMS च्या साहाय्यानेदेखील पॅन-आधारची जोडणी करू शकता. यासाठी आयकर विभागाच्या 567678 किंवा 56161 नंबरवर SMS पाठवा. वरील पद्धतींचा वापर करून तुन्ही पॅन-आधार कार्डची जोडणी करू शकता आणि आपलं आर्थिक नुकसान टाळू शकता.