Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी ट्वीटरच्या नियमात बदल
Twitter (Photo Credits-Getty Images)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपनंतर (whatsapp) आता ट्वीटरने (Twitter) नियमात बदल केले आहे. तसेच मायक्रो ब्लॉगिंग साईटच्या माध्यमातून स्पॅम पाठवणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी ट्वीटरवर फॉलोअर्सच्या संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका दिवसाला फक्त 400 नवीन ट्वीटर हँडल फॉलो करता येणार आहेत.

यापूर्वी ट्वीटरवर फॉलो करण्याची मर्यादा 1000 होती. परंतु आता सॅन फ्रॅन्सिस्कोच्या कंपनीकडून एका दिवसाला फक्त 400 पेक्षा अधिक ट्वीटर हँडल फॉलो करु शकणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाोठी ट्वीटरने भारतासाठी जाहीरात पारदर्शकता केंद्र स्थापन केल आहे. यामुळे लोकांना राजकीय पक्षांनी जाहीरांतीवरील केलेला खर्च पाहता येणार आहे. त्याचसोबत जाहीरातदारांना जाहीरातीवर किती खर्च केला आहे हे सुद्धा सांगावे लागणार असून याबद्दलचे नियम अधिक कठोर केले आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019 साठी राजकीय पक्षांच्या फेसबुकवर 10 कोटींच्या जाहिराती; भाजप पक्षाकडून जाहिरातींवर सर्वाधिक खर्च)

या सेवेमुळे आता सामान्य नागरिकांना विविध पक्षांनी जाहीरातींवर किती खर्च केला आहे ह्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. तसेच समाजातील कोणत्या वर्गाच्या दृष्टीने राजकीय पक्षाने जाहीरात तयार केली असल्याचीसुद्धा माहिती मिळणार आहे.