स्वित्झरलँड स्थित तंत्रिक कंपनी लॉजिटेक (Logitech ) ने आपला ब्रँड असलेला लॉजिटेक जी हेडफोन (Logitech G Gaming Headset) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या नव्या वायर्ड गेमिंक हेडसेटची किंमत 6,795 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नवा लॉजिटेक जी-335 (Logitech G- 335) वायर्ड गेमिंग हेडफोन अॅमेझॉनवर ब्लँक अँड व्हाइट रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेन. कंपनीने एका प्रतिक्रियेदरम्यान म्हटले आहे की, हा हेडफोन वजनाला हलका आहे. तो केवळ 240 ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. लॉजिटेक जी 335 गेमिंग हेडसेट हा या कंपनीचा आतापर्यंचा सर्वात कमी वजनाचा हेडसेट आहे.
कंपनीने हेडफोनबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे की, जी733 वायरलेस हेडसेटप्रमाणेच नव्या हेडफोनचे डिझाईन केले आहे. जी 335 मध्ये लहान आणि सर्वात रफअँड टफ असा डिजाईन आहे. Logitech G- 335 गेमिंग हेडसेट हा प्रदीर्घ काळ युजर्सला वापरासाठी आरामदाई आहे. तसेच, डोक्याला आणि कानाला घट्ट बसतो. या हेडसेट अॅडजस्टेबल सस्पेंशन हँडबँड डिजाइन आणि सॉफ्ट-फॅब्रिक ईयरपॅड मैटिरियल्स पासून बनवला आहे. (हेही वाचा, Upcoming Smartphones: नव्या फिचर्ससह 'या' कंपन्यांचे मोबाईल भारतीय बाजारात येण्यास सज्ज, जाणून घ्या कधी होणार लॉंच)
कंपनीने म्हटले आहे की, मॅचिंग रिवर्सिब हँडबँडसह लॉजिटेक जी 335 लॉजिटेक जी उत्पादनांशी साधर्म्य असेल आणि रंगसंगती मिळतीजुळती असेल अशाच पद्धतीने त्याचे डिझाईन करण्यात आले आहे. या हेडफोनची नवी एडीशन आपली गेमिंग स्पेस आणि कस्टमाईज आणि पर्सनलाइज करण्यासाठी अधिक संधी देतो.
लॉजिटेक जी-335 हेडसेटमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅकच्या माध्यमातून जवळपास कोणत्याही गेमिंग प्लॅटफॉर्मसोबत उपयोग करणे सोपे व्हावे यासाठी प्लग अँड प्ले क्षमता देण्यात आली आहे. पूर्ण गेमिंग-ग्रेड ऑडियो गुणवत्ता, बिल्ट-इन नियंत्रण, वॉल्यूम रोलर आणि एक फ्लिप-टू-म्यूट माइक अशा फिचर्सनी हा हेडफोन युक्त आहे.