लेनोवो (Lenovo) कंपनीने भारतात आपला नवा टॅबलेट Lenovo Tab P11 Pro लाँच केला आहे. या टॅबलेटची आकर्षक वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हा टॅबलेट भारतीय बाजारात असलेल्या Samsung Galaxy Tab S7 आणि Apple iPad Air (2020) ला तगडी टक्कर देणार आहे. या टॅबलेट सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात जबरदस्त कॅमेरा (Camera) आणि स्टोरेज (Storage) देण्यात आले आहे. हा टॅबलेट 14 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon, Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Lenovo Tab P11 Pro भारतात किंमत 44,999 रुपये इतकी आहे. हा टॅबलेट ऑनलाईन खरेदी करताना 10,000 रुपयांचा की-बोर्ड कव्हर मोफत मिळेल. यूजर या ऑफरचा लाभ केवळ सुरुवातीच्या 30 दिवसांमध्येच घेऊ शकतात.हेदेखील वाचा- Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये
Introducing the all new Tab P11 Pro.
One of Lenovo’s most premium Android tablets, featuring state-of-the-art design, display and smart capabilities.
Perform like a pro, feel like a pro, get stuff done like a pro.
Get yours today!#Lenovo #LenovoTabs #Tab #TabP11Pro #LikeAPro pic.twitter.com/yasHoya9Y5
— Lenovo India (@Lenovo_in) February 13, 2021
लेनोवो टॅब पी11 प्रो च्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 11.5 इंचाची डिस्प्ले दिली आहे. यात WQXGA OLED डिस्प्ले येते ज्याचे रिजोल्यूशन 2560X1600 पिक्सेल आहे. हा HDR ला सपोर्ट करतो. या टॅबचा डिस्प्ले Dolby Vision ला सुद्धा सपोर्ट करतो.
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP इंफ्रारेड कॅमेरा दिला आहे. टॅबलेटच्या मागील बाजूस ड्यूल कॅमेरा दिला देला आहे. यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा वाइड अँगल सेंसर दिला आहे. हा 4G LTE ला सपोर्ट करतो.
या टॅबलेटच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर, यात 6GB LPDDR4x रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. हा टॅब Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याच्या अंतर्गत स्टोरेजमध्ये UFS 2.1 चे सपोर्टसुद्धा मिळते.