Kia Seltos Facelift: कीया सेल्टोस घेवून येत आहे नवीन फीचर्स, लवकरच मार्केटमध्ये येणार 'ह्या' धमाकेदार फीचर्स सह
kia- file

Kia Seltos Facelift 2023:  दक्षिण कोरायाची वाहन उत्पादक कंपनी नवीन फीचर्स सह सेलटोस कीया फेसलिफ्ट घेवून येणार आहे. येत्या 4 जुलै रोजी ही कंपनी नवीन फीचर्समधील कीया गाडी घेवून येणार आहे. जुलैच्या अखेरीस त्याची किंमत देखील ठरवणार आहे. ह्या कंपनीने 2019 रोजी भारतात कीया नावाची लॉंन्च केली होती. त्यांनतर ती लोकांमध्ये  खुप प्रसिध्द झाली. ह्या नवीन फीचर्सं सर्वांनाच आवडणारे असतील,

कंपनीने ह्या मॉडेलद्वारे बाह्य आणि आंतरिक गोष्टींमध्ये बदल करणार आहे.नवीन फीचर्स मध्ये येणारी सेल्टोस त्यांच्या फीचर्सनुसार किंमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. एअर बॅग आणि हिलअसिस्ट कंट्रोल मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

फस्ट बंपरला खास डिजाइन केल्याचे सांगितले आहे. सेल्टोसच्या आतील भागात सर्वात मोठे अपडेट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नवीन ट्विन-स्क्रीन लेआउट दिले जाणार आहे. सेल्टोस फेसलिफ्ट 115hp मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि 116hp सह 1.5-लिटर डिझेल इंजिनसह चालू ठेवण्याची क्षमता आहे. कंपनी बहुधा फेसलिफ्टसह टर्बो-पेट्रोल इंजिनच्या डिसाइन मध्ये बदल करेल. कारमध्ये 19 इंचाचे टायर्स मिळतील. त्याचबरोबर पैनोरमिक सनरुफ मिळण्याची शक्यता आहे