कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या नव्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग पुढे ढकलले होते. मात्र आता कंपन्यांना स्मार्टफोनची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याच कारणास्तव आता स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे नव्या मॉडेलचे स्मार्टफोन बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा एक नवा कोरो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्याकडे आता संधी आहे. कारण जून महिन्यात भारतात एकापेक्षा एक अधिक दमदार फिचर्स असणारे स्मार्टफोन कंपन्यांनी ग्राहकांसाठी लॉन्च केले आहेत. तर जाणून घ्या जून महिन्यात कोणते स्मार्टफोन लॉन्च झाले असून त्याच्या फिचर्सबाबत अधिक माहिती.(Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर 23 ते 27 जूनदरम्यान चालणार महासेल; स्मार्टफोन्सवर मिळणार घसघशीत सूट, See Offers)
नोकिया एक्सप्रेस म्युझिक (Nokia Xpressmusic) हा स्मार्टफोन गेल्याच आठवड्यात भारतात लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने जुने फिचर असलेला त्यांचा हा स्मार्टफोन एका नव्या अवतारात उपलब्ध करुन दिला आहे. Nokia 5310 एचएमडी ग्लोबल मार्केट मध्ये उतरवण्यात आला असून ऑगस्ट 2007 मधील लॉन्च करण्यात आलेल्या Nokia 5310 XpressMusic चे रिफ्रेश वर्जन आहे. यामध्ये युजर्सला सिंगल चार्जवर 22 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळणार आहे. Nokia 5310 मध्ये प्रीलोडेड MP3 प्लेअर दिला आहे. हा स्मार्टफोन वायरलेस FM सह सुद्धा देण्यात येणार असून यामध्ये डेडिकेटेड म्युझिक-कीज आणि ड्युअल स्पीकर्स सुद्धा दिले आहेत. फोनच्या रियर पॅनलवर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा सेंसर सुद्धा दिला आहे.(Realme Buds Q भारतात Realme X3 च्या सीरिजसह येत्या 25 जूनला होणार लॉन्च)
सॅमसंग गॅलेक्सी A21s हा स्मार्टफोन सुद्धा भारतात गेल्याच आठवड्यात लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये युजर्सला 6.5 इंचाचा Infinity-O डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा ऑस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोनची बॅटरी 21 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले ब्लॅक सपोर्ट करते. फोनची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन लेटेस्ट Exynos 850 चिपसेट पॉवर्ड असून जो AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 सह येतो. फोनमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज दिला असून जो युजर्सला 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.
ओप्पो फाइंड x2 सीरिज (Oppo Find x2) गेल्याच आठवड्यात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या या दोन स्मार्टफोनसाठी कॅमेरा आणि बॅटरी सोडून अन्य काही फिचर्स सारखेच युजर्सला मिळणार आहेत. यामध्ये 6.7 इंचाचा QHD+अल्ट्रा व्हिजन कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचे रिजोल्यूशन 1440X3168p आहे.