Realme Buds Q भारतात Realme X3 च्या सीरिजसह येत्या 25 जूनला होणार लॉन्च
Realme Buds Q (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme भारतीय बाजारात येत्या 25 जूनला Realme X3 सीरिज लॉन्च करणार आहे. या सीरिज मधील Realme X3 आणि RealmeX3 SuperXoom स्मार्टफोन उतरवणार आहेत. कंपनीने अधिकृतपणे याबाबत माहिती देत असे म्हटले आहे की, Realme X3 च्या सीरिजसह भारतात Realme Buds Q सुद्धा लॉन्च करण्यात येणार आहेत. कंपनीने वायरलेस इअरबड्स यापूर्वी विदेशात लॉन्च केले आहेत.(Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर 23 ते 27 जूनदरम्यान चालणार महासेल; स्मार्टफोन्सवर मिळणार घसघशीत सूट, See Offers)

रिअलमी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर 1 मिनिट 14 सेकेंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अपकमिंग Realme Buds Q बाबत सांगण्यात आले आहे. भारतात हे डिवाइस येत्या 25 जूनला दुपारी 12.30 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. युजर्सला याच्या लॉन्चिंग कार्यक्रमाचे लाईव्ह कंपनीच्या अधिकृत चॅनल्स किंवा व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या माध्यमातून पाहता येणार आहे.(Realme X3 आणि Realme X3 SuperZoom भारतात 25 जून रोजी होणार लॉन्च; पहा काय आहेत फीचर्स)

शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत Realme Buds Q काळ्या रंगात उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वायरलेस बड्स ब्लॅक, व्हाइट आणि रेड रंगात उपलब्ध होतील. युजर्सला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा Flipkart येथून ते खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.