
JioPhone 2 Sale: रिलायन्स जिओ (Reliance Jio) नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांसाठी खूप साऱ्या ऑफर्स घेऊन आला आहे. आता जिओ फोन 2 (JioPhone-2) वर देखील ऑफर सुरु झाली आहे. हा फोन 2017 मध्ये लॉन्च झाला असून हा नवा फोन जिओचे एक्सटेंडेड व्हर्जन आहे. जिओफोन 2 ची किंमत 2,999 रुपये आहे. यात तीन मोठे बदल करण्यात आले असून आता या फोनमध्ये युट्युब, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप देखील सपोर्ट करेल.
फोनमध्ये केलेले नवे बदल :
JioPhone-2 हा फोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता. या फोनमध्ये रिलायन्सने एका खास फिचर जोडले आहे. ज्यामुळे या फोनमध्ये युजर्स व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि युट्युबचा वापर करु शकता. जिओफोन-2 KAI ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. यात गुगल मॅप्सचा देखील तुम्ही वापर करु शकता. जिओफोन 2 मध्ये देशात बोलल्या जाणाऱ्या 24 भाषा वापरता येतील. (कुंभमेळ्यासाठी जिओने लाँच केला खास ‘कुंभ जिओफोन’; जाणून घ्या काय आहेत फीचर्स)
जिओफोन 2 चे फिचर्स :
जिओफोन 2 मध्ये फुल किबोर्डसोबत हॉरिजेंटल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात टायपिंग करणे सोपे होईल. या फोनमध्ये तुम्हाला 2.4 इंचाचा डिस्प्ले आणि 512 MB चे रॅम असेल. यात तुम्हाला 4GB इंटरनल स्टोरेज मिळेल. ज्यात मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 128 GB पर्यंत मेमरी वाढवू शकता. यात 2 मेगापिक्सलचा सेल्फी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि FM असेल. फोनमध्ये 2,000mAh ची बॅटरी असेल.
रिलायन्स इंडस्ट्रीय लिमिटेडच्या 41 व्या सभेत ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या हस्ते जिओफोन-2 लॉन्च करण्यात आले. त्यानंतर 15 ऑगस्टपासून हा फोन युजर्ससाठी उपलब्ध झाला. मात्र अधिक मागणीमुळे अनेकांना हा फोन उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आज 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात होणार आहे.