रिलायन्सची (Reliance) सहाय्यक कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसायांसाठी (Micro, Small and Medium Businesses) खास ऑफर दिली आहे. याअंतर्गत छोट्या व्यवसायांना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत 10 टक्के दराने इंटीग्रेटेड फायबर कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. यासह त्यांना डिजिटल सोल्यूशन्सही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे लोकांना त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. कंपनीने त्याला JioBusiness असे नाव दिले आहे आणि JioBusiness नावाने जिओच्या वेबसाइटवर एक पेजही लाइव्ह झाले आहे.
या अंतर्गत ब्रॉडबँड आणि व्हॉईस कॉलिंगसाठी व्यावसायिकांना दरमहा फक्त 901 रुपये द्यावे लागतात. यात 100 एमबीपीएस इंटरनेटचा वेग मिळेल. या योजनेचा फायदा देशातील 5 कोटी लघुउद्योगांना होणार आहे. रिलायन्स जिओने एक प्रेस नोट जारी करत म्हटले आहे की, सूक्ष्म आणि लघु व्यवसाय करणारे लोक कनेक्टिव्हिटी म्हणजेच ब्रॉडबँड प्लान आणि व्हॉईस कॉलिंगवर दरमहा 15-20 हजार रुपयांपर्यंत खर्च करतात. आता जिओने उर्वरित कंपन्यांपेक्षा 90 टक्के स्वस्त ब्रॉडबँड आणि व्हॉईस कॉलिंग योजना आणल्या आहेत, ज्याचा फायदा जवळजवळ प्रत्येक व्यावसायिकाला होईल. (हेही वाचा: Reliance JioBook Laptop: स्वस्त स्मार्टफोननंतर आता रिलायन्स सादर करत आहे 'जिओबुक लॅपटॉप', लवकरच भारतात होणार लाँच)
इतर दूरसंचार ऑपरेटर 100 एमएसएमबी कनेक्टिव्हिटी देण्यासाठी महिन्याला 9,990 रुपये आकारतात. यामध्ये 100 एमबीपीएस स्पीडसह अमर्यादित फायबर ब्रॉडबँड आणि अमर्यादित व्हॉइस ऑफर केले जाते. जिओ छोट्या व्यावसायिकांना या सर्व सुविधा अवघ्या 901 रुपयांमध्ये देत आहे. या व्यतिरिक्त जिओ निश्चित मोबाईल कन्व्हर्जनची सुविधाही देत आहे. त्याअंतर्गत, एमएसएमबी त्यांच्या कार्यालयाबाहेर व्यवसाय कॉल देखील करू शकते. त्याचबरोबर, जिओ लहान व्यापाऱ्यांना दरमहा 5001 रुपयांच्या विशेष ऑफरद्वारे 1GBPS स्पीडसह अमर्यादित फायबर ब्रॉडबँड आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सेवा प्रदान करेल. सोबतच डिजिटल सोल्यूशन्स आणि डिव्हाइस देखील प्रदान करेल.