जिओ (Jio) देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये विविध किंमती मधील काही प्रीपेड प्लॅन्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये युजर्सला अपेक्षेपेक्षा अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे जप तुम्ही योग्य प्लॅन निवडण्यास सक्षम नसाल तर आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका खास रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या त्या प्लॅन संदर्भात माहिती देणार आहोत ज्यामध्ये डेली 3gb डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रिमिय अॅपचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.(Jio ने लाँच केला धमाकेदार प्लान; ग्राहकांना देण्यात येणार एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सेवा, जाणून घ्या सविस्तर)
जिओ कंपनीचा 349 रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन 100SMS आणि 3GB डेटा मिळणार आहे. त्याचसोबत युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये दिले जाणार आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच 5G नेटवर्क संबंधित मोठे विधान केले होते. सरकारच्या मते देशात सध्या 5G रोलआउट करणे शक्य नाही. भारतात याची सुरुवात 2022 च्या सुरुवातीला केली जाऊ शकते. संसदीय पॅनलच्या रिपोर्ट्सनुसार, पुढील 6 महिन्यानंतर एक अन्य स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. त्यानंतर भारतात 5G पुढील वर्षापर्यंत रोलआउट केला जाऊ शकतो.(Vodafone Idea च्या युजर्ससाठी नवी सुविधा! WhatsApp द्वारे करु शकता पेमेंट; जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
संसदीय पॅनलच्या रिपोर्टमधून Reliance चे सीईओ मुकेश अंबानी यांच्या योजनांना जोरदार झटका लागू शकतो. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी असे म्हटले होते की, Jio वर्ष 2021 च्या दुसऱ्या छमाही पर्यंत भारतात 5G सर्विस लॉन्च करणार आहे. अंबानी यांच्या विधानानुसार, 5G सर्विस मध्ये Jio सर्वाधिक पुढे असणार आहे. यंदा Airtel आणि Jio कडून सुद्धा 5G सर्विसची तयारी केली आहे. या दोन्ही कंपन्यांना आता फक्त सरकारची परवानगी मिळणे शिल्लक आहे.