भारतातील विविध टॅलिकॉम कंपन्यांवरील कर्जाचा बोजा भरण्यासाठी त्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. यामुळे प्लॅनच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून त्याचा फटका थेट ग्राहकांना बसला आहे. मात्र मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनीच्या जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 40 टक्क्यांनी वाढ केली आङे. परंतु जिओचे असे काही प्लॅन आहेत त्यांची किंमत 25 टक्क्यांनी स्वस्त आहेत. जिओचे नवे टॅरिफ प्लॅन 6 डिसेंबर पासून लागू होणार आहेत. जिओची प्रतिस्पर्धी कंपन्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी त्यांच्या प्लॅनध्ये 40-50 टक्क्यांनी वाढ केली आहे. या कंपन्यांचे नवे प्लॅन 3 डिसेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.
रिलायन्स जिओकडून असे सांगण्यात आले आहे की, कमी किंमतीत ग्राहकाला अधिक फायदा होण्यासाठी आणि जुन्या प्लॅनच्या 300 टक्के अधिक लाभ या प्लॅनमुळे होणार आहे. जिओच्या काही प्लॅनमध्ये आता 1000, 2000, 3000 आणि 12000 पर्यंत IUC मिनिटे देण्यात आली आहेत. तर जाणून घ्या जिओचे कोणते प्लॅन अजूनही स्वस्त आहेत.
जिओने 149 रुपयांच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली असून 199 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यामध्ये ग्राहकाला 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंगसोबक 1000 मिनिटापर्यंत अन्य नेटवर्कवर कॉलिंग फ्री असणार आहे. तर एअरटेलच्या 248 आणि वोडाफोन-आयडियाच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये सुद्धा अशाच प्रकारे उपलब्ध करुन दिले आहेत.
त्याचसोबत जिओने 399 रुपयांचा प्लॅन दर वाढवून 555 रुपये केले आहेत. यामध्ये 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग मिळणार आहे. तसेच 3 हजार मिनिटापर्यंत अन्य नेटवर्कवर कॉलिंगसुद्धा करता येणार आहे. तर एअरटेल 598 आणि वोडाफोन-आयडियामध्ये 599 रुपयात या सुविधा मिळणार आहेत.(फ्री कॉलिंग नंतर आता फ्री डाटा प्लानवरही लगाम लागण्याची शक्यता, TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या सूचना)
एकावर्षाच्या जिओच्या प्लॅनची किंमत 1699 रुपयांवरुन 2199 रुपये करण्यात आली आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12 हजार मिनिटे मिळणार आहेत. तर एअटरेटल 2398 रुपये आणि वोडाफोन-आयडिया 2399 रुपयांना प्लॅन खरेदी करता येणार आहेत.