भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओने 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओफोन वापरकर्त्यांसाठी दोन स्वस्त रिचार्ज योजना सुरू केल्या आहेत. यातील एका योजनेची किंमत 39 रुपये आहे, तर दुसऱ्या योजनांची किंमत 69 रुपये आहे. (वाचा - Airtel आणि Vi चा खास प्लॅन; 49 रुपयांच्या फ्री प्लॅनमध्ये मिळवा 'या' सुविधा)
जिओच्या 39 रुपयांच्या योजनेचे फायदे
जिओ फोनच्या 39 रुपयांच्या रिचार्जबद्दल बोलायचं झाल्यास या योजनेला 14 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100MB डेटा मिळतो. यासह, या योजनेत सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळतात. याव्यतिरिक्त जिओ अॅप्सची सदस्यताही विनामूल्य दिली जात आहे.
जिओच्या 69 रुपयांच्या योजनेचे फायदे
जिओच्या 69 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनची वैधताही 14 दिवसांची आहे. पण यात तुम्हाला दररोज 0.5GB जीबी डेटा वापरायला मिळेल. या योजनेत, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यासह, वापरकर्त्यांना जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता देखील मिळते.
जिओची विनामूल्य कॉल आणि रिचार्ज ऑफर
रिलायन्स जिओने अलीकडेचं कोरोना संकट आणि लॉकडाऊन पाहता जिओ फोन वापरकर्त्यांसाठी 300 मिनीटे विनामूल्य आउटगोइंग मिनिटे जाहीर केली. याव्यतिरिक्त, जिओने जिओ फोन वापरकर्त्यांसाठी buy one get one रीचार्जची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, जिओ फोनच्या रिचार्जवर त्याच किंमतीचा दुसरा रिचार्ज पॅक विनामूल्य उपलब्ध होईल. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण कोरोना व्हायरस साथीच्या कालावधीसाठी जिओ फोन वापरकर्त्यांसाठी दरमहा 300 मिनिटांची नि: शुल्क आउटगोइंग सुविधा प्रदान केली जाईल.