जिओ दिवाळी ऑफर : रिचार्जवर 100% कॅशबॅक तर 8GB अतिरिक्त डेटा
रिलायन्स जिओ दिवाळी ऑफर (Photo Credit : jio.com)

रिलायन्स जिओ दरवर्षी युजर्ससाठी दिवाळी ऑफर्स सादर करतात. यंदा देखील कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी खास दिवाळी ऑफर सादर केली आहे. या अंतर्गत युजर्सला अनेक आकर्षक डिस्काऊंट मिळत आहेत. युजर्सला रिचार्जसाठी 100% कॅशबॅकअंतर्गत अधिक डेटा मिळत आहे. पाहुया का या आहे ऑफर....

दिवाळी ऑफरअंतर्गत युजर्सला 100% कॅशबॅक दिले जाईल. त्यासाठी युजरला 149 किंवा त्याहुन अधिक किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक कुपन किंवा व्हाऊचर मिळेल. हे व्हाऊचर्स MyJio अॅप किंवा रिलायन्स स्टोरमधून रिडीम करता येतील. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत मर्यादीत आहे. पण मिळालेले व्हाऊचर्स तुम्ही या वर्षाखेरीसपर्यंत रिडीम करु शकता. हे रिडीम करण्यासाठी युजर्सला कमीत कमी 5,000 रुपयांची खरेदी करावी लागेल. हे व्हाऊचर्स तुम्हाला MyJio अॅपवर MyCoupons सेक्शनमध्ये मिळतील.

हे व्हाऊचर्स Bookmyshow, Google, Cleartrip आणि Google Play वर रिडीम करता येणार नाही. ही ऑफर्स जिओच्या पूर्वीपासून असलेल्या आणि नव्या युजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. या ऑफरची अधिक माहिती तुम्हाला या लिंकवर मिळेल..

https://www.jio.com/en-in/jio-diwali-cashback-offer

जिओ सेलिब्रेशन पॅक

याशिवाय कंपनी जिओ सेलिब्रेशन पॅकमध्ये 8 जीबी डेटा उपलब्ध करुन देत आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड आहे. यात युजर्सला रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. ही ऑफर युजर्सला मिळाल्याची खात्री करण्यासाठी युजर्सच्या MyJio अॅपवर जा. त्यानंतर मेन्यूवर जाऊन My Plans वर क्लिक करा. नवे पेज ओपन होईल त्यावर युजर्सला जिओ सेलिब्रेशन पॅकचे सर्व डिटेल्स मिळतील.