Reliance Jio | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

Jio Prepaid Cheapest Recharge Plan: रिलायन्स जिओ (Jio) च्या यूजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जिओने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या यादीतून 119 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. ज्या वापरकर्त्यांना थोड्या काळासाठी डेटा आणि वैधता हवी होती त्यांच्यासाठी हा प्लान खूप फायदेशीर होता.

तथापी, Jio चा 119 रुपयांचा रिचार्ज प्लान आतापर्यंत कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान होता. पण आता यूजर्स त्याचा फायदा घेऊ शकणार नाहीत. जिओने हा प्लान संपवला आहे. आता जिओच्या यादीतील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 149 रुपयांचा आहे. म्हणजेच आता जिओ वापरकर्त्यांना स्वस्त प्लॅनसाठी पूर्वीपेक्षा 30 रुपये जास्त खर्च करावे लागतील. (हेही वाचा - Mobile Screen Time Limit for Kids: मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी चीनकडून उपाययोजना)

दरम्यान, 119 रुपयांमध्ये Jio यूजर्सना उत्तम ऑफर्स मिळत होत्या. यामध्ये कंपनी ग्राहकांना एकूण 14 दिवसांची वैधता देत होती. यासोबतच ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा देण्यात येत होता. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध होते. यामध्ये कंपनी यूजर्संना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही देत होती.

आता स्वस्त प्लॅनसाठी वापरकर्त्यांना 149 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1GB डेटा मिळतो. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 दिवसांची वैधता मिळते.