Jio सोबत Google लवकरत लॉन्च करणार परवडणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार अत्यंत स्वस्तात इंटरनेट डेटा
Sundar Pichai (Photo Credit: twitter)

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी गुरुवारी असे म्हटले की, कंपनी Jio सोबत हातमिळवणी केली असून खिशाला परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन तयार करणार आहोत. गेल्या वर्षात गुगलने 33,737 कोटी रुपयांचा Jio च्या प्लॅटफॉर्ममध्ये 7.7 टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्याचसोबत दोन दिग्गज कंपन्यांनी एक कर्शिअल अॅग्रीमेंट सुद्धा केले होते. त्यानुसार एक एन्ट्री लेव्हल अफोर्डेबल स्मार्टफोन तयार करण्याचा करार झाला होता.(नवीन सूचनांमुळे WhatsApp चे कामकाज व वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार नाही; नागरिकांच्या Right of Privacy हक्काचा आदर करण्यास सरकार कटिबद्ध- Government of India)

सुंदर पिचाई यांनी एशिया पॅसिफिकच्या निवडक रिपोर्ट्सह वर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही एक अफोर्डेबल स्मार्टफोन तयार करण्याचा विचार करत आहोत. या प्रोजेक्टवर Jio आणि Google मिळून काम करत आहोत. त्यांनी फोनच्या किंमतीसह अन्य माहिती बद्दल काहीच सांगितले नाही. मात्र कंपनीने कंन्फर्म केले ही फोन स्वस्त किंमतीसह डेटासह उतरवला जाणार आहे. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचवण्यास मदत होणार आहे. गुगलने जीओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या इंडिया डिजिटायझेशन फंडने गुंतवणूक केली आहे. त्याची घोषणा गेल्या वर्षात करण्यात आली होती.(WhatsApp: नव्या नियमांमुळे युजर्सचा प्रायव्हसी भंग होतो- व्हॉट्सअॅप)

गुगल कडून इंडिया डिडिटायझेशन फंड मध्ये 10 बिलियन डॉलर फंडची गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याचसोबत या वर्षाच्या अखेर पर्यंत काही मोठ्या घोषणा सुद्धा केल्या जाऊ शकतात. सुंदर पिचाई यांनी कोविड19 च्या कारणामुळे या प्रोजेक्टवर पडणारा थेट परिणाम यावर असे म्हटले की, कोविड सारख्या महासंकटात लोकांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजी महत्वपूर्ण ठरत आहे. तर आम्ही एक अफोर्डेबल प्राइसमध्ये फोन काढण्याच्या दिशेने काम करत असल्याचे ही सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.