Work From Home Postpaid Plan: घरातून काम करण्यासाठी सर्वोत्तम 4G पोस्टपेड प्लान; जाणून घ्या जिओ, एअरटेल आणि Vi चा 'वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान'
Jio, Airtel and Vi (PC - PTI)

Work From Home Postpaid Plan: बर्‍याच लोकांना प्री-पेड आणि ब्रॉडबँड योजना आवडत नाहीत. असे लोक पोस्टपेड योजना वापरतात. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल अशा लोकांच्या सोयीसाठी अनेक पोस्टपेड योजना लाँच करत असतात. आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाच्या काही 4 जी पोस्टपेड योजनांबद्दल सांगणार आहोत. जे खासकरून घरातून काम करण्यासाठी बनवलेल्या आहेत. चला तर मग या योजनाबद्दल जाणून घेऊयात... (वाचा - 5G Technology आणि Spectrum परीक्षणाला दूरसंचार मंत्रालयाचा हिरवा झेंडा; भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी दूरसंचार कंपन्या करणार 5G परीक्षणाला सुरूवात)

जिओचा वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान -

जिओची 799 रुपयांची पोस्टपेड योजना आहे, ज्यामध्ये 150 जीबी डेटा उपलब्ध आहे. डेटाची वैधता प्रति बिलिंग आहे. या योजनेत 200 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा आहे. या योजनेंतर्गत दोन सिम कार्डे वापरली जाऊ शकतात. या योजनेतील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. या योजनेंतर्गत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टारला एक वर्षाची सदस्यता मिळत आहे.

एअरटेलचा वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान -

एअरटेलच्या बेस्ट डेटा पोस्टपेड योजनेची किंमत 749 रुपये आहे. या प्लानमध्ये दोन सिमसाठी 125 जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गतही 200 जीबी डेटा रोलओव्हर, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. या योजनेत डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी आणि अॅमेझॉन प्राइमची एक वर्षासाठीची सदस्यता मिळते.

व्होडाफोन आयडियाचा वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान -

व्होडाफोन आयडियाचा वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान जिओ आणि एअरटेलपेक्षा स्वस्त आहे. व्होडाफोन आयडिया योजनेची किंमत 699 रुपये आहे. या योजनेत आपल्याला दररोज अमर्यादित डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. अमर्यादित डेटा सुविधेमुळे या प्लानमध्ये डेटा रोलओव्हरची कोणतीही सुविधा नाही.