व्हॉट्सअॅपवर सध्या Jio च्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. तो मेसेज Jio Breaking ऑफर 2020 च्या नावाने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेगाने एकमेकांना शेअर केला जात आहे. मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की, मुकेश अंबानी जगातील 4th सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनल्याने नीता अंबानी यांनी 99 हजार जिओ युजर्सला 401 रुपयांच्या रिचार्ज देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. त्यात एक लिंक सुद्धा दिली असून त्यावर क्लिक केल्यास रिचार्ज आपल्या क्रमांकावर करावा असे म्हटले आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा मेसेज आला असेल तर त्यावर क्लिक करु नका. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.
व्हॉट्सअॅपचा हा मेसेज एक न्यूज वेबसाईटच्या लिंकसह जाहीर करण्यात आला आहे. ही न्यूज अगदी सामान्य बातम्यांच्या वेबसाईट सारखीच आहे. यामध्ये खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन 401 रुपयांचा फ्री रिचार्ज करण्याचा दावा केला आहे. मात्र जर तुम्ही त्यावर क्लिक केल्यास तुमची फसवणूक होईल. त्याचसोबत तुमचा फोन क्रमांक सुद्धा देऊ नका. ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्याचे ही सांगण्यात येत आहे. मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जिओकडून अशा पद्धतीचे रिचार्ज प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी असून वेगाने पसरवली जात आहे.(ग्राहकांना Jio ची भेट! आता विमानामध्ये घेऊ शकणार Calling, Internet चा आनंद; जाणून घ्या काय आहेत जिओचे आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स)
जर तुम्ही मेसेज मधील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला सांगितले जाईल की, 401 रुपयांचा फ्री जिओ रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 3जीबी डेटा 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. त्याचसोबत 399 रुपयांसह येणारा Disney+Hotstar चे एका वर्षापर्यंत फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. ऐवढेच नाही तर वेबसाईटच्या दाव्यानुसार या ऑफरचा लाभ 62 हजारांहून अधिक युजर्सने घेतला आहे. रिलायन्स जिओकडून ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच कंपनीची ऑफिशियल बेवसाइट व्यतिरिक्त कोणतेही अन्य रिचार्ज प्लॅन जाहीर करण्यात आलेले नाहीत.