iQOO 9, iQOO 9 Pro आणि  iQOO 9 SE स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या अधिक
Smartphone apps (Photo Credits: Unsplash)

iQOO 9 सीरिज भारतात लॉन्च झाली आहे. या सीरिजनुसार कंपनीने iQOO 9 Pro 5G, iQOO 9 आणि iQOO 9 SE चे तीन स्मार्टफोन लॉन्च  केले आहेत. iQOO 9 Pro हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. तर iQOO 9 हा मिड-रेंज स्मार्टफोन आहे. तर iQOO 9 SE हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. तसेच iQOO गेम पॅड आणि iQOO 50W वायरलेस फास्ट चार्जर दिले आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट iQOO 9 Pro 5G स्मार्टफोनसाठी वापरला गेला आहे.(Samsung Galaxy S22 सीरिजची 'या' दिवशी पासून सुरु होणार प्री बुकिंग, ग्राहकांना मिळणार धमाकेदार ऑफर्स)

Samsung Galaxy S22 सीरीज या चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. iQOO 9 ला Snapdragon 888+ आणि iQOO 9 SE Snapdragon 888 चिपसेटचा सपोर्ट दिला गेला आहे.तर जाणून घ्या स्मार्टफोनच्या या सीरिज संदर्भात अधिक माहिती.

>>किंमत

iQOO 9 Pro 5G

8GB+256GB - रु 54,990

12GB+256GB - रु. 69,990

हा फोन Legend आणि Dark Cruise या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनची प्री-बुकिंग 23 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे.

iQOO9

8GB+128GB - रु 42,990

12GB+256GB - रु 46,990

हा फोन Legend आणि Alpha या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनची प्री-बुकिंग 23 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

iQOO 9 SE

8+ 128GB - रु 33,990

12+256GB - रु 37,990

फोन सनसेट सिएरा आणि स्पेस फ्यूजन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनची प्री-बुकिंग 23 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

>>ऑफर

iQOO कडील 50W वायरलेस फ्लॅश चार्जरची किंमत 4,499 रुपये आहे. त्याच वेळी, iQOO गेम पॅड 2,999 रुपयांना खरेदी करता येईल. iQOO द्वारे iQOO 9 मालिकेच्या खरेदीवर रु. 10,000 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. iQOO 9 Pro ला ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर iQOO 9 वर 4000 रुपये आणि iQOO SE वर 3000 रुपयांची सूट मिळत आहे.

iQOO 9 Pro मध्ये 6.78K 2K AMOLED 3D वक्र डिस्प्ले असेल. यात 3D अल्ट्रा सोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. iQOO 9 Pro मध्ये 4,700mAh बॅटरी, 120W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग फीचर मिळेल. iQOO 9 Pro 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा उपलब्ध आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा 50MP चा आहे, जो GN5 Gimble वैशिष्ट्याला सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये 50MP वाइड अँगल आणि 16MP पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

तर iQOO 9 ला 6.56-इंचाचा FHD + 10-बिट AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच-सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असेल. यात 4,350mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. iQOO 9 5G मध्ये Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा प्राथमिक कॅमेरा 48MP देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 13MP चे आणखी दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 16MP कॅमेरा मिळेल.

iQOO 9 SE ला 6.62-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळेल. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच-सॅम्पलिंग रेटला देखील सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. यात 4,500mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. iQOO 9 SE मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. याचा प्राथमिक कॅमेरा 48MP देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 13MP वाइड अँगल कॅमेरा उपलब्ध असेल. तसेच मोनो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 16MP कॅमेरा देखील मिळेल.