आयफोन लव्हर्ससाठी धमाकेदार ऑफर ; iPhone XS आणि XS Max वर  7,000 ची सूट
आयफोन XS Max (Photo Credit: iMore.com)

तुम्हाला पण आयफोनची क्रेझ आहे का? आणि तुम्ही देखील Apple iPhone XS आणि XS Max खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच लॉन्च झालेले iPhone XS आणि XS Max हे अनेक प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही प्री ऑर्डरही करु शकता. हे दोन्हीही स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलमध्ये खरेदी करु शकता. याशिवाय अॅप्पल प्रिमीयर रिसेलर आणि ऑफिशियल स्टोर्सवर याची विक्री केली जात आहे.

ई कॉमर्स साईट पेटीएम मॉलवरुन खरेदी केल्यानंतर एक्सचेंज बोनस म्हणून 7,000 रुपये सेव्ह होतील. पेटीएम मॉलवर आयफोन खरेदी केल्यानंतर कॅशबॅकसोबतच ईजी ईएमआई ऑप्शन्स दिला जात आहे. याशिवाय अॅप्पलचे जूने आयफोन्स देखील तुम्ही येथीत स्वस्त दरात खरेदी करु शकता.

अॅपलचे नवीन स्मार्टफोन भारतात अधिकृत रिसेलर्सकडून उपलब्ध होतील. ज्यात iPhone XS आणि XS Max 64 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहेत. त्यात ग्रे, सिल्वर आणि गोल्ड हे रंग मिळतील. ज्याची किंमत 99,900 रुपये ते 1,09,900 रुपये आहे.

आयफोन iPhone XS आणि XS Max मध्ये ड्युअल सिम आणि ड्युअल स्टँडबाय फंक्शन आहेत. तसंच अॅपलच्या नव्या ए12 बॉयोनिक चिपसेट आहे. जो 7-एनएम डिझाईन आणि ज्यात नविन न्यूरल इंजिन लेन्स आहे. तसंच त्यात 8-कोर डेडिकेटेड मशीन लर्निग (एमएल) प्रोसेसर देण्यात आला आहे.

अॅपलने गेल्या आठवड्यात कॉलिफोर्नियातील एका कार्यक्रमात नवीन आयफोन्स आणि अॅपल वॉच लॉन्च केले. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुकने सांगितले की, ''हे डिव्हाईस पैसा वसूल करणारे आहे. कारण कोणतीही व्यक्ती इतर कोणत्याही डिव्हाईसऐवजी फक्त आयफोन घेण्यास प्रथम पसंती देईल.''