अॅपल (Apple) कंपनीने आपल्या आयफोनच्या सीरिजमधील iPhone XR वर एक स्पशेल सूट देणार आहे. तर एप्रिल महिन्यात कंपनीने आयफोन एक्सआरसाठी एक प्रमोशनल ऑफरची घोषणा केली होती. त्याअंतर्गत आता कूपर्टीनो सलग्न कंपनीने आयफोन एक्सआर या फोनवर चक्क 17,001 रुपयांची बंपर सूट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये एक्सआर 76,900 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. मात्र सध्या या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली असून ग्राहकांना त्यासाठी 59,900 रुपये मोजावे लागत आहेत. तर 12GB मॉडेलसाठी ग्राहकांना 64,900 रुपयांना उपलब्ध आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला आयफोन एक्सआरसाठी सुरु करण्यात आलेल्या ऑफरनुसार HDFC क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यात आली होती. परंतु ही ऑफर सध्या सुरु नसली तरीही 10 टक्के अतिरिक्त सूटचा फायदा SBI ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे 64GB असणाऱ्या एक्सआरसाठी ग्राहकांना 53,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Netflix भारतात घेऊन येतोय Mobile-Only सब्स्क्रिप्शन प्लॅन, आता स्वस्तात करता येणार Chill)
त्याचसोबत एक्सचेंज ऑफर्सचा फायदासुद्धा ग्राहक घेऊ शकतात. iPhone 7 Pluse वर एक्सचेंज सूट 20 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच iPhone 6 साठी सूट 8 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्ससुद्धा एक्सचेंज करत सूटचा फायदा होणार आहे.