Instagram Layout Feature: आता इन्स्टाग्राम 'स्टोरी स्टेटस'मध्ये एकाच वेळी शेअर करता येणार 6 फोटो!
Instagram (PC -pixabay)

Instagram Layout Feature: इन्स्टाग्राम तसेच व्हाट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमी वेगवेगळे फिचर्स आणत असते. अनेक लोक इन्स्टाग्राम अॅपचा वापर करत असतात. आता इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी नवं फिचर्स आणलं आहे. या फीचरमुळे कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय युजर्सना त्यांच्या 'स्टोरी स्टेटस'मध्ये (Story Status) एकावेळी 6 फोटो शेअर करता येणार आहेत. यापूर्वी युजर्स थर्ड पार्टी अ‍ॅपमधील लेआऊटच्या मदतीने एकावेळी 2 ते 3 फोटो कोलाज करून शेअर करू शकत होते. परंतु, आता इन्स्टाग्रामने त्यात दुरुस्ती करत नवीन फिचर्स आणलं आहे. या फिचर्समुळे इन्स्टाग्राम युजर्सना एकाच स्टोरी स्टेटसमध्ये 6 फोटो शेअर करता येणार आहे. (हेही वाचा - Christmas Sale: विवो कंपनीचे व्ही 17, व्ही 17 प्रो, व्ही 15 प्रो यांच्यासह 'या' 5 स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार विशेष सूट)

इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅडम मॉसरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून नव्या फिचरची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या फिचरचा वापर करून युजर्स एकाचवेळी 6 फोटो ग्रीड फॉरमॅटच्या माध्यमातून शेअर करू शकतात.

तसेच इन्स्टाग्रामनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही या नव्या फोटो फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये युजर्सना नवीन फिचर्स समजावून सांगण्यासाठी फोटो ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले 6 फोटो शेअरही करण्यात आले आहेत.

इन्स्टाग्रामने या नव्या फिचरला 'ले-आऊट' फिचर्स असे नाव दिले आहे. आपल्या मोबाइलमधील गॅलरीमध्ये असलेल्या छायाचित्रांचा वापर करून फोटो ग्रीड फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. तसेच इन्स्टाग्राम युजर्स इन्स्टा कॅमेराचा वापर करूनही ग्रीड फॉरमॅटमध्ये फोटो तयार करू शकतात.