Instagram Reels (Photo Credits: Twitter)

भारत सरकारने टिकटॉक (TikTok) सह आणखी 58 चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. भारतात टिकटॉकचे प्रचंड क्रेझ होते. त्यामुळे टिकटॉक बॅन झाल्याने 15 सेकंदाचे व्हिडिओ बनवून मनोरंजन करणारे दुसरे कोणतेही अॅप सध्या उपलब्ध नाही. या संधीचा फायदा घेत इंस्टाग्रामने (Instagram) नवीन फिचर इंस्टाग्राम रिल्स (Instagram Reels) याचे टेस्टिंग व्हर्जन (Testing Version) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या फिचरमध्ये युजर्स शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना एडिट करु शकतात आणि ते अपलोडही करु शकतात. युजर्स हे व्हिडिओज इंस्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्संसह शेअर करु शकतील आणि जर त्यांचे अकाऊंट पब्लिक असेल तर पूर्ण इंस्टाग्राम कम्युनिटीला ते हे व्हिडिओज पाहता येतील. (TikTok Pro Scam: महाराष्ट्र सायबल सेल कडून टिकटॉक प्रमाणे भासणार्‍या खोट्या अ‍ॅपच्या लिंक्स ओपन न करण्याचं आवाहन; खाजगी माहिती चोरली जाण्याची शक्यता)

फेसबुक इंडियाचे व्हाईस प्रेसिडन्ट आणि मॅनेजिंग डिरेक्टर अजित मोहन यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या काळात व्हिडिओ पाहणाऱ्या आणि बनवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर 1/3 पोस्ट या व्हिडिओज असतात. देशातील सर्व लोकांच्या मनोरंजनामध्ये इंस्टाग्राम हे अॅप मुख्य भूमिक बजावते. इंस्टाग्राम रिल्स हे भविष्यात मनोरंजनाचे एक साधन होणार आहे आणि देशातील विविध क्रिएटीव्ह लोकांना टॅलेंट दाखवण्याचे प्लॅटफॉर्म बनणार आहे. इंस्टाग्राम हे जगभरामध्ये 10 कोटी लोकांपेक्षा अधिक युजर्स आहेत. आता हे युजर्स रिल्सचा वापर करुन स्वतःची कला सादर करत लोकांचे मनोरंजन करु शकतात. युजर्स 15 सेकंदाच्या शॉर्ट व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड करुन त्यामध्ये ऑडिओ इफेक्ट्स देऊन इंस्टाग्रामवर पोस्ट करु शकतात.

कसे बनवाल शॉर्ट व्हिडिओज?

इंस्टाग्रामच्या रिल्स फिचरमध्ये युजर्स टिकटॉक सारखे 15 सेकंदाचे व्हिडिओज बनवू शकतात. व्हिडिओ बनवताना बँकग्राऊंड बदलण्याचा ऑप्शनही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे टिकटॉकप्रमाणे व्हिडिओचा स्पीडही युजर्स अॅडजस्ट करु शकतात. तसंच यामध्ये Duet फिचर सुद्धा अॅड करण्यात आले आहे. या फिचरचा वापर करुन एका व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळे युजर्स एकत्र व्हिडिओ बनवू शकतात.

इंस्टाग्रामचे हे नवे फिचर भारतीय युजर्ससाठी बुधवारी, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून उपलब्ध असेल आणि हे फिचर लॉन्च झाल्यानंतर या फिचरमध्ये काही प्रसिद्ध कलाकारांचे शॉर्ट क्लिप्स आधीपासून पॉप्युलेडेट असतील. या आधी इंस्टाग्रामचे रिल फिचर ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्स या तीन देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. इंस्टाग्राम या नवीन फिचरवर गेल्या वर्षभरापासून काम करत असून या फिचरमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओशी संबंधित खूप सारे क्रिएटीव्ह टुल्स अॅड करण्यात आले आहेत.