जगातील दुसऱ्या क्रमांकावर भारतात सर्वाधिक इंटरनेट युजर्सची संख्या, रिपोर्टमधून उघड
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

जगभरात सध्या इंटरनेटचा वापर दर सेकंदाला केला जातो. त्यामुळे माणूस सर्वोतोपरी आता इंटरनेटवर अवलंबून राहू लागला आहे. याच स्थितीत जगभरातील इंटरनेट युजर्सची संख्या कोटीपेक्षा अधिक आहे. तर चीन नंतर आता भारतात सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जात असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. तसेच भारत हा इंटरनेट वापराच्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला असल्याचा रिपोर्ट इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने (IMAI) दिला आहे.

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशात इंटरनेटची सोय फक्त 36 टक्के भागात पर्यंत सीमित आहे. मात्र इंटरनेटचा अधिक विस्तार केल्यास त्याची संख्या अधिक वाढणार आहे. तसेच 45.1 करोड युजर्समधील 38.5 करोड युजर्स 12 वर्षापेक्षा अधिक वयोगटामधील आहे. तर 5 वर्षामधील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 6.6 करोड असून नातेवाईकांच्या मोबाईलवरुन इंटरनेटचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरात इंटरनेट युजर्सची संख्या 19.2 करोड असून ग्रामीण विभागातील इंटरनेट युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. तर 16-29 वयोगटातील युजर्स सर्वाधिक इंटरनेटचा दिवसागणिक अधिक वापर करत आहेत. त्याचसोबत एक तृतीयांश इंटरनेट युजर्स एका तासापेक्षा अधिक वेळ त्याचा वापर करतात. ग्रामीम भागात एक तृतीयांश युजर्स 15-30 मिनिटे इंटरनेटचा उपयोग करत असल्याचे रिपोर्ट मधून सांगण्यात आले आहे.(अभिमानास्पद! जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी)

देशात इंटरनेट युजर्स महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी असल्याचे रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. तर 25.8 करोड पुरुष मंडळी इंटरनेटचा वापर करत असून या पेक्षा अर्धी संख्या महिलांची आहे. राज्यातील केरळ, तमिळनाडू आणि दिल्ली येथे इंटरनेट वापरणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.