'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा' असलेला Vivo Z1 Pro स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारात दाखल
Vivo Z1 Pro (Photo Credits: Vivo India)

आयफोनला जबरदस्त टक्कर देणारी नामांकित कंपनी विवो लवकरच भारतात 'झेड 1 प्रो' (Vivo Z1 Pro)हा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. विवोने याबाबत फ्लिपकार्टसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे 'विवो झेड 1 प्रो' मोबाइलमध्ये इन डिस्प्ले कॅमेरा असणार आहे. विवोने नुकतेच ह्या स्मार्टफोनच्या टीजरमध्ये Vivo Z1 Pro चे फिचर्स हायलाईट रिलीज केले आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा मिळालेली नाही.

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 700 सीरिजचा प्रोसेसर असू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी क्षमता असू शकते.

मागील महिन्यात चीनमध्ये 'Vivo Z5 X' हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. 'विवो झेड 1 प्रो' स्मार्टफोन हा त्याच स्मार्टफोनचा वेरिएंट असण्याची शक्यता आहे. 'विवो झेड 5 एक्स'च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी वेरिएंटच्या मोबाइलची किंमत 1398 येन (जवळपास 14 हजार 400 रुपये) आहे. तर, 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1498 येन (जवळपास 15 हजार 400 रुपये) आहे. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मोबाइल वेरिएंटची किंमत 1998 येन (जवळपास 20 हजार 500 रुपये) आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 'विवो झेड 1 प्रो' ड्युल सिम असणार आहे. फोनमध्ये अॅण्ड्रॉइड 9 पाईवर आधारित फनटच ओएस 9 असणार आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.53 इंचाचा असून एचडी असण्याची शक्यता आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असून 8 जीबीचा रॅम असू शकतो. त्याशिवाय ट्रिपल कॅमेऱ्यामध्ये रिअर पॅनेलमध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे.