Samsung च्या मदर्स डे 2020 ऑफर्स जाहीर; Galaxy Z Flip, S20 Series स्मार्टफोन्स वर मिळणार दमदार सूट!
Samsung Galaxy Z Flip (Photo Credits: Samsung Official Twitter)

मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. यंदा तो 10 मे दिवशी साजरा केला जाईल. यंदाच्या मदर्स डे चं औचित्य साधत आता सॅमसंग कंपनीने खास मदर्स डे ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सॅमसंगने यावर्षी लॉन्च झालेल्या फ्लॅगशिप Galaxy डिव्हाईससाठी यंदाच्या मदर्स डे ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये Galaxy Z Flip फोल्डेबल स्मार्टफोन आणि Galaxy S20 सीरीज स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हांला धमाकेदार ऑफर्स मिळू शकतात. मग यंदा मदर्स डे दिवशी आईला नवा स्मार्टफोन विकत घेऊन सरप्राईज देण्याचा प्लॅन असेल तर पहा सॅमसंगची ही मदर्स डे 2020 ऑफर नक्की आहे तरी का? तुम्हांला कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात? Mother's Day 2020 Gift Ideas: यंदा लॉकडाऊनमध्येही 'मदर्स डे' स्पेशल करू शकतात ही खास गिफ्ट्स!

Samsung ची मदर्स डे 2020 ऑफर काय?

Samsung च्या मदर्स डे ऑफर डे मध्ये यंदा Galaxy Z Flip फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांना 11,990 रुपये किंमतीचे Galaxy Buds+ को 3,999रूपयांमध्ये मिळणार आहेत. तर Samsung Galaxy S20 सीरीज चे डिव्हाईज खरेदी करणार्‍यांना Samsung Care+ प्रोटेक्शन प्लान वर 50% डिस्काउंट ऑफर दिली जाणार आहे. हा प्रोटेक्शन प्लॅन सुमारे 1999 रूपयांमध्ये मिळणार आहे.

Samsung ची ही मदर्स डे ऑफर Galaxy Z Flip आणि Galaxy S20 सीरीज साठी 4 मे पासुन 11 मे 2020 दरम्यान खरेदीवर मिळणार आहे. तर ग्राहकांना या ऑफर दरम्यान दिली जाणारी कूपन 7 ते 25 मे 2020 दरम्यान वापरण्याची मुभा असेल.

इतर खास ऑफर्स

Samsung Galaxy Z Flip खरेदी करणार्‍यांना अन्य खास ऑफर्सदेखील मिळणार आहेत. यामध्ये नो कॉस्ट इएमआय, वर्षभरासाठी एक्सीडेंटल स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन, Z प्रीमियर सर्विस ऑफर मिळणार आहे.

सॅमसंगने स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आणि डिव्हाईसचा सेल 4 मे पासून सुरू केला आहे. 24 मार्च पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी सॅमसंगची विक्री थांबली होती. पण आता ग्रीन झोन, ऑरेंज मध्ये काही प्रमाणात संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणत आता व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत.