स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन आणि दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip लाँच केला मात्र त्याची भारतात विक्री कधी सुरु होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. सॅमसंगचा सर्वात आकर्षक आणि जबरदस्त फिचर्स असलेला हा स्मार्टफोन आजपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोरवरुन हा स्मार्टफोन तुम्हाला बुक करता येईल. प्री बुकिंग केलेल्या ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपची डिलिवरी 26 फेब्रुवारीपासून दिली जाणार आहे.
या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर यात 6.7 इंचाची फुल एचडी प्लस डायनेमिक अॅमोल्ड डिस्प्ले देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फोल्ड केल्यानंतरही यात 1.1 इंचाचा सुपर अमोल्ड डिस्प्ले मिळतो. यातील दुसरा डिस्प्ले हा केवळ नोटिफिकेशन पाहणे, वेळ पाहणे आणि गाणे ऐकणे वा बदलण्यासाठी वापरण्यात येईल. या फोनचे वजन 183 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा- Vodafone च्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल, युजर्सला मिळणार 10 दिवसाची अधिक वॅलिडिटी
या स्मार्टफोनच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, यात 8GB रॅम आणि 256GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. यात 7 नॅनोमीटरचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 1,09,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रियर पॅनलवर 2 कॅमेरे देण्यात आले आहेत. यात एक वाइड आणि दुसरी अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. यात कॅमे-यासोबत ऑप्टिकल अमेज स्टेबलायजेशन दिला आहे.
Samsung Galaxy Z Flip मध्ये 3300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये वायरलेस पॉवर शेअर सुद्धा आहे.