वोडाफोन कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवे प्लॅन लॉन्च करत आहे. नुकत्याच कंपनीने 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. त्याचसोबत 555 रुपयांचा जुना प्लॅन रिवाइज केला आहे. याच स्थितीत आता कंपनीने 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केला असून ग्राहकाला पूर्वीपेक्षा आता 10 दिवसांची अधिक वॅलिडिटी मिळणार आहे. वोडाफोनने हा प्लॅन जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी रोलआउट केला होता. कंपनी अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा त्यांच्या युजर्सला अधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या रिचार्ज प्लॅन सोबत आता कंपनीने पुन्हा 19 रुपयांचा अनलिमिटेड प्रीपेड प्लऐन सुद्धा परत आणला आहे. यामध्ये युजर्सला पूर्वीपेक्षा अधिक डेटा मिळणार आहे. त्यानुसार 150 ऐवजी आता 200MB डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी मात्र 2 दिवस असणार आहे. पण युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच कंपनीने 129 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला होता. सुरुवातीला या प्लॅनसाठी 14 दिवसांची वॅलिडिटी देण्यात आली होती. कंपनीने हा प्लॅन आता रिवाइज केला असून आता या प्लॅनची वॅलिडिटी 24 दिवसांची केली आहे. प्लॅनमध्ये ग्राहकाला अनलिमिडेट कॉलिंग मिळणार आहे. तसेच 300 एसएमएस आणि 2 जीबी डेटा सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला वोडाफोन प्लेसाठी फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे.(दमदार फिचर्स आणि उत्कृष्ट बॅटरी लाईफ असलेला Samsung Galaxy A01 स्मार्टफोन लाँच; पाहा या बजेट स्मार्टफोनची अन्य वैशिष्ट्ये)