Huawei ने अलीकडेच Mate 40 सीरीजमध्ये Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्याचबरोबर कंपनीने नवीन स्मार्टफोन Mate 30E Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Mate 30 Pro ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. हा स्मार्टफोन Kirin 990 प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. Huawei Mate 30E Pro सध्या चीनमध्ये लाँच झाला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्री बुकिंगसाठी तो उपलब्ध झाला आहे. तथापि, त्याची किंमत जाहीर केलेली नाही. हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या रंगांच्या रूपांमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये स्पेस सिल्वर, ग्रीन, कॉस्मिक पर्पल आणि ब्लॅक कलरचा समावेश आहे. याशिवाय हा स्मार्टफोन दोन लेदर फिनिश शेडमध्येही उपलब्ध असेल. यात व्हेगन लेदर फॉरेस्ट ग्रीन आणि व्हेगन लेदर ऑरेंज शेड्स आहेत. (हेही वाचा -Google Play Music App झाले बंद; वापरकर्त्यांना म्यूझिकसाठी वापरावं लागेल YouTube Music अॅप)
Huawei Mate 30E Pro फिचर्स -
Huawei Mate 30E Pro Android 10 च्या साहाय्याने EMUI 11 वर काम करतो. यात 6.53 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1176x2400 पिक्सेल असून आस्पेक्ट रेश्यो 20: 9 आहे. हा स्मार्टफोन HiSilicon Kirin 990E प्रोसेसरसह सुसज्ज आहे आणि ग्राफिक्ससाठी यात 14 core Mali-G76 जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 40W सुपरचार्ज फास्ट चार्जिंगसह 4,500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. (वाचा - Flipkart Dussehra Specials Sale: फ्लिपकार्ट वर दस-यानिमित्त या स्मार्टफोन्सवर जबरदस्त बंपर ऑफर्स, वाचा सविस्तर)
याशिवाय फोटोग्राफीसाठी Huawei Mate 30E Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 40 एमपी प्राइमरी सेन्सर, 40 एमपी वाइड एंगल लेन्स, 8 एमपी ओआयएस सपोर्ट आणि डीप सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 एमपीचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे, जो 3 डी डेप्थ सेंसरसह आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात 5 जी, 4 जी एलटीई, ब्लूटूथ, यूएसबी टाइव सी पोर्ट आणि एनएफसी, आदी फिचर्स आहेत.