जीमेल (Gmail) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी नवनवे फिचर्स सादर करत असतं. आता जीमेलच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त गुगलने नवे फिचर सादर केले आहे. या फिचरद्वारे ई-मेल पाठवण्याची वेळ ठरवता येणार आहे. Schedule Send असे या फिचरचे नाव असून याद्वारे तुम्हाला ई-मेल पाठवण्याची वेळ शेड्युल करता येणार आहे. (Workplace Harssement रोखण्यासाठी गूगलची ठोस पाऊलं, वेबसाईट वरून करता येणार तक्रार)
Schedule Send हे फिचर कसे वापराल?
# सर्वप्रथम जीमेल ओपन करा.
# लॉगइन करा.
# नवीन मेल करण्यासाठी 'Compose'पर्यायावर क्लिक करा.
# मेल विंडो ओपन झाल्यावर सब्जेक्टसह मेल रेडी करा. ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ई-मेल आयडी लिहा.
# त्यानंतर Send हा पर्यायावर क्लिक करण्यासाठी शेजारी असलेल्या बाणासारख्या आयकॉनवर क्लिक करा.
# तिथे Schedule Send चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळेला समोरच्या व्यक्तीला ई-मेल पाठवू शकता.