WhatsApp वरील ग्रुप चॅट्स SIGNAL Messaging App वर ट्रान्सर करण्याची इथे पहा स्टेप बाय स्टेप माहिती!
Mobile User | Representational Image (Photo credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) नुकतीच त्यांची Terms of Service and privacy policy अपडेट केली आहे. नव्या नियमावलीमध्ये युजर्सच्या माहितीची सुरक्षा यावर प्रश्न उभारण्यात आल्याने अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपला अलविदा म्हणत टेलिग्राम, सिग्नल (Signal) सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप कडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने खुलासा करत नव्या नियमावलीमध्ये केवळ बिझनेस अकाऊंटससाठि अपडेट असतील, सामान्य युजर्सचे चॅट सुरक्षित असतील त्यांची प्रायव्हसी जपली जाईल असे सांगण्यात आले आहे. पण काहींनी आता सिग्नल वापरण्यास सुरूवात देखील केली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अकडेवारीत अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअर मध्ये सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड मध्ये अव्वल असल्याचं सांगण्यात आले आहे. WhatsApp Privacy Policy नकोशी? मग सर्व्हर वरून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट, Messages असे करा कायमचे बंद!

अनेकदा अशाप्रकारे अ‍ॅप मध्ये स्विचिंग करताना तुमचा डाटा ट्रांसफर करण्याचं मोठं आव्हान युजर्स समोर असतं. पण आता सिग्नल अ‍ॅप ने ते सोयीस्कर केले आहे. मग पहा व्हॉट्सअ‍ॅप वरून सिग्नल वर तुमचे ग्रुप चॅट्स कसे ट्रान्सफर कराल?

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट्स सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप वर कसे ट्रान्सफर कराल?

  • सिग्नल अ‍ॅप ओपन करा. उजव्या बाजूला असणार्‍उआ 3 डॉट्सवर क्लिक करा आणि नवा ग्रुप बनवा.
  • ग्रुपला नाव द्या आणि आवश्यक असणारे इतर कॉन्टॅक्स त्यामध्ये अ‍ॅड करा.
  • आता ग्रुप चॅट बॉक्स ओपन करा. उजव्या बाजूला असणार्‍या 3 डॉट्सवर क्लिक करा. सेटिंग्स मध्ये ग्रुप लिंकचा पर्याय निवडा.
  • ग्रुप लिंक साठी टॉगल चा पर्याय ऑन करा. त्यानंतर शेअर वर क्लिक करा.
  • आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पेस्ट करा.

आता या लिंकच्या आधारे सिग्नल ग्रुप वर कोणीही चॅट करू शकतं.दरम्यान सिग्नलने दिलेल्या माहितीनुसार आता अ‍ॅडमीन कधीही लिंक ऑफ करू शकते. दरम्यान अ‍ॅडमिन केवळ व्हॉट्सअ‍ॅपची नव्हे तर अशाप्रकारे कोणत्याही इतर अ‍ॅपची लिंक शेअर करू शकतो.