मोबाईल चोरीला गेल्यास WhatsApp अकाऊंट सुरक्षित कसे ठेवाल?
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

जगभरात 200 कोटीहून अधिक WhatsApp चे युजर्स आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये चॅटिंग, फोटो-व्हिडिओ सह व्हाईस-व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आल्याने याची लोकप्रियता अधिकच आहे. यामुळेच व्हॉट्सअॅपमध्ये आपला प्रायव्हेट डेटा सेव्ह असतो. अशातच फोनची चोरी झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच फोन चोरी झाल्यास WhatsApp अकाऊंट रिकव्हर कसे करावे आणि सुरक्षित कसे ठेवावे, यासाठी काही खास ट्रिक्स. फोन चोरी झाल्यानंतर सर्वप्रथम सिम ब्लॉक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा 198 या क्रमांकावर संपर्क करु शकता. (WhatsApp वर सिक्रेट ग्रुपच्या माध्यमातून लपवता येणार फोटो-व्हिडिओ, जाणून घ्या कसे)

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर असलेला आपला डेटा सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे अशावेळी या खालील ट्रिक्स तुम्हाला नक्कीच कामी येतील.

WhatsApp लॉगइन करा:

आता आपल्या फोनमध्ये नवे सिम अॅक्टिव्हेट करा. नवे सिम अॅक्टिव्हेट झाल्यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगइन करा. व्हॉट्सअॅप एकावेळी एकाच फोनवर काम करतो. त्यामुळे चोरी झालेल्या फोनवरुन व्हॉटसअ‍ॅप आपोआप लॉगआऊट होईल.

WhatsApp इमेल करा:

व्हॉट्सअॅप अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला ईमेल करा. यासाठी तुम्हाला कंट्री कोड (+91) तुमचा मोबाईल नंबर आणि 'Lost/Stolen: Please deacticate my account' असा मेसेज टाईम करुन सेंड करायचा आहे. यामुळे तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट डिलिट न होता काही वेळासाठी डिअॅक्टीव्हेट होईल.

बायोमीट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करा:

तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट बायोमीट्रिक ऑथेंटिकेशनने सुरक्षित करा. त्यासोबतच तुम्ही जर टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरु केले तर नक्कीच फायदा होईल. यामुळे दुसरं कोणालाही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगइन करण्यासाठी पासकोडची गरज पडेल. परिणामी तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट सुरक्षित राहील. सिम कार्ड किंवा फोन हरवल्यानंतर टू-स्टेप व्हेरिफिकेशन नक्कीच कामी येईल.

मोबाईल चोरी झाल्यानंतर गांगरुन न जाता या ट्रिक्सचा वापर करुन आपला मोबाईल डेटा सुरक्षित ठेवा.