How to Get Free Windows 10 Update: विंडोज 10 मोफत अपडेट करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Windows 10 (Photo Credits: Pixabay)

बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानयुग देखील बदलत चाललं आहे. त्यामुळे संगणकामध्ये Windows XP, Windows 7 ची जागा आता Windows 10 ने घेतली. त्यामुळे तुमच्यापैकी अजूनही कोणी विंडोज 7, विंडोज 7 वापरत असतील आणि त्यांना विंडोज 10 अपग्रेड करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप वा संगणकामध्ये मोफत Windows 10 अपग्रेड करता येईल. त्यासाठी काही ठराविक स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे. विंडोज 7 वा विंडोज 8 वापरत असलेल्या युजर्सला Windows 10 अपडेट करायचे असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे जुन्या जेनुअन लायसेंसची गरज असेल. हा प्रोग्राम 2016 मध्ये समाप्त झालेला. मात्र अजूनही अनेक जण याचा लाभ घेत आहे.

त्यामुळे Windows 10 चे मोफत अपडेट मिळवण्यासाठी यूजर्सकडे विंडोज 7 आणि विंडोज 8 चे हे जेनुअल लायसेंस असणे गरजेचे आहे. त्यानंतर विंडोज 10 अपडेट मिळवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे ते पाहूयात

1. आपल्या कम्प्यूटरच्या ब्राउजरवर आपल्याला Windows 10 डाऊनलोड पेज ओपन करुन विंडोज 10 इन्स्टॉल टूल डाऊनलोड करावा लागेल.हेदेखील वाचा- Google Map ला कशी कळते Live Traffic ची माहिती, येथे जाणून घ्या

2. त्यानंतर विंडोजची ISO फाइल डाऊनलोड करुन आपल्या बूटेबलच्या पेनड्राईवमध्ये ते सेव्ह करावे लागेल.

3. त्यानंतर Media Creation Tool ओपन करुन तुम्हाला "Upgrade this PC now" वर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला अटी आणि नियम दिले असतील. त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला तो ड्राईव सिलेक्ट करावा लागेल जेथ Windows 10 ला इन्स्टॉल करायचा आहे.

4. सर्वसाधारणपणे ऑपरेटिंग सिस्टला C/: drive मध्ये सेव्ह केले जाते. येथे लक्षात ठेवा की तुम्हाला फ्रेश इन्स्टॉलवर क्लिक करायचे नाही आहे. असे केल्यास तुम्हाला मोफत Windows 10 अपग्रेड करता येणार नाही.हेही वाचा- Paytm च्या माध्यमातून LPG Cylinder बुकिंगवर मिळणार 500 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या

5. यानंतर एकदा का इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला Windows 10 अॅक्टिव करावा लागेल.यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शनची गरज लागेल.

6. त्यानंतर कम्प्यूटरमध्ये Windows Update मध्ये Activation वर क्लिक करावे लागेल.

7. त्यानंतर 'Activate' बटणवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जुन्या Windows 7 वा Windows 8 चा लायसेन्स टाकावे लागेल आणि तुमचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट होईल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कम्यूटर वा लॅपटॉपमध्ये विंडोज 10 प्रोग्राम अपडेट करु शकता. विंडोज 10 मध्ये तुम्हाला खूप अॅडव्हान्स फंक्शनचा फायदा घेता येईल.