सध्या गुगल कंपनीने (Google) प्ले स्टोअर वरुन टिकटॉक (TikTok) हे अॅप काढून टाकले आहे. तसेच आयओएसने (IOS) सुद्धा त्यांच्या अॅपस्टोर मधून टिकटॉक अॅप डाऊनलोड करता येणार नाहीये. त्यामुळे सध्या तरुण मंडळी टिकटॉक बंद झाल्यामुळे त्रस्त झाली आहेत. मात्र टिकटॉक अॅप डाऊन लोड करण्यासाठू वारंवार जुगाड करताना दिसून येत आहेत.
जगातील सर्वात लोकप्रिय चीनी अॅप टिकटॉकवर सरकारने बंदी घातली. तर हे अॅप आजवर अनेक लोकांनी डाऊनलोड केले होते. मात्र भारतात टिकटॉकवर बंदी घातल्याने तरुण मंडळीं त्रस्त असून गुगलवर How to download tiktok app असे सर्च करत आहेत. त्यामुळे गुगल ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार Downlod tiktok आणि Download tiktok app अशा पद्धतीने जास्त लोकांनी सर्च केल्याचे सांगितले आहे.(हेही वाचा-TikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट)
तसेच टिकटॉक बंद झाल्यामुळे काहींनी युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून हे अॅप कसे डाऊनलोड करावे हे सर्च करत आहेत. मात्र टिकटॉक जरी भारतात बंद झाले असले तरीही Vigo Video, LIKE Video, TogetU हे अॅप अद्याप सुरु आहेत.