E-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल? 'या' आहेत सोप्या स्टेप्स
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

How To Download E-Aadhaar: आधारकार्ड अतिशय महत्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आधारकार्ड हे अत्यंत गरजेचे असून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा अधिक फायदा होता. महत्वाचे म्हणजे, एखाद्या व्यक्तीने आधारकार्ड बनवल्यानंतर त्याला लगेच भेटत नाही. तसेच नवीन बनवलेले आधारकार्ड हे संबंधित व्यक्तीला 15 ते 20 दिवसांनंतर घरी पाठवले जाते. मात्र, पत्ता बदल्यामुळे काहीजणांना अनेकदा नवीन आधारकार्ड मिळवण्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात. अशावेळी नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून स्वत: ई- आधारकार्ड डाऊनलोड करू शकतात. यामुळे खालील माहिती अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कोणतीही व्यक्ती ज्यावेळी आपले नवीन आधारकार्ड बनवून घेतो. त्यावेळी त्याला एक एनरोलमेंट नंबर मिळतो. त्यानंबरच्या मदतीने आपले आधारकार्ड ऑनलाईनदेखील डाऊनलोड करता येते. ई-आधारकार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर, त्यानंबरवर पाठवण्यात आलेला वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी, नाव, पत्ता आणि आपली जन्मतारीख याचे तपशील द्या. त्यानंतर आधारकार्ड आपल्या पत्यावर पाठवले जाते. यासाठी सर्वप्रथम आधारच्या UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in वर जा. https://eaadhar.uidai.gov.in/ या लिंकवर जाऊन ही तुम्ही आधारकार्ड डाऊनलोड करू शकतात. या लिंकवरून थेट ई-आधारकार्ड डाऊनलोड करता येणार आहे. हे देखील वाचा- WhatsApp Multiple Device Feature: व्हॉट्सअॅप लवकरच बीटा वापरकर्त्यांसाठी मल्टीपल डिव्हाइस फीचर्स अपडेट करणार; काय आहे खासियत? घ्या जाणून

सध्या आधार कार्ड हे देशाचे नागरित्व असल्याची मूळ ओळख दाखवून देते. त्यामुळे प्रत्येक कामासाठी प्रथम आधार कार्ड आहे का असे विचारले जाते. तसेच आधार कार्ड के आता स्मार्टकार्डसारखे सुद्धा बनवता येते. मात्र जर तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास चिंता करु नका. कारण युआयडीएआय (UIDAI)ने आधार कार्ड हरविल्यान ते पुन्हा प्रिंट (Re-Print) करता येईल अशी सुविधा सुरु करण्यात आली आहे.