WhatsApp Multiple Device Feature: व्हॉट्सअॅप लवकरच बीटा वापरकर्त्यांसाठी मल्टीपल डिव्हाइस फीचर्स अपडेट करणार; काय आहे खासियत? घ्या जाणून
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हाट्सअॅप (WhatsApp) जगातील सर्वात लोकप्रिय 'इन्स्टंट मेसेजिंग अॅप' आहे. त्यामुळे जगभरात 12 कोटींहून अधिक लोक व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअॅप चॅट अनुभव घेण्यासाठी वेळोवेळी नवीन अपडेट्स येत असतात. आता व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. व्हाट्सअप गेल्या बऱ्याच दिवसांपासून मल्टी डिव्हाइस (Multiple Device) विकसित करण्यासाठी काम करत आहे. मल्टी डिव्हाइसमुळे वापरकर्त्यांना एक व्हाट्सअप अकाउंट डेस्कटॉप, टॅबलेट आणि फोन इत्यादी डिव्हाइसला एकाच वेळी जोडता येणार आहे. मल्टी डिव्हाइसचे काम शेवटच्या स्टेजवर आले असून लवकरच वापरकर्त्यांना या फिचर्सचा फायदा घेता येणार आहे.

डब्ल्यूएबीएटाइन्फोने (WABetaInfo) या नवीन फीचरबद्दल बरीच माहिती दिली आहे. नावाप्रमाणेच, आपण एकाच वेळी एकाधिक डिव्हाइसवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करण्यास सक्षम असाल. सध्या बरेच वापरकर्ते व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवर लॉग इन करून वापरतात. परंतु, यासाठी अट अशी होती की, व्हॉट्सअ‍ॅप असलेले मुख्य उपकरण त्या डिव्हाइस जवळ असले पाहिजे आणि त्यात इंटरनेट चालू असणे गरजेचे होते. मात्र, नवीन मल्टी-डिव्हाइसमध्ये अशी अट नाही की मुख्य डिव्हाइस चालू केले पाहिजे किंवा इंटरनेट असले पाहिजे. यामुळे वापरकर्ते मुख्य डिव्हाइसशिवाय दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन करू शकतात. हे देखील वाचा- Realme Narzo 20 सीरीज भारतात झाले लाँच, 'या' दिवशी होणार पहिला सेल

व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या फीचर्समध्ये बदल करत वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. यामुळे येत्या काही दिवसातच व्हाट्सअपमध्ये येणारे मल्टीपल डिव्हाइसला वापरकर्त्यांची पसंती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी व्हाट्सअपने ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचे फिसर्च अपडेट करून वापरकर्त्यांच्या आनंदात भर टाकली होती.