WhatsApp मध्ये व्हिडिओ, फोटोजचा GIF बनवून फाईल कशी पाठवलाल?
WhatsApp Logo (Photo Credits: Pexels)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर लोकं आता केवळ मेसेज पाठवण्यासाठी नव्हे तर व्हिडिओ कॉल आणि अगदी व्य्वसायासाठी देखील करू शकतात. फेसबूकच्या मालकीचं हे मेसेजिंग़ आता आबालवृद्धांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. दरम्यान वाढती स्पर्धा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून जवळ येणारं जग पाहता आता व्हॉट्सअ‍ॅप दिवसागणिक अधिकाधिक युजर्स जोडण्यासाठी तसेच सध्या व्हॉट्सअ‍ॅप वापरत असलेल्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी सतत्याने अपडेट्स दिले जातात. दरम्यान आता तुम्ही व्हिडिओ हे जिफच्या (GIFs) स्वरूपातदेखील पाठवू शकता. हे तुम्हांला ठाऊक आहे का? तुम्हांला ठाऊन नसेल तर आता जाणून घ्या. अगदी सहज तुम्हांला व्हिडिओ GIF च्या रूपात फॉर्वर्ड करणं शक्य आहे. आयफोन आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये सहज व्हिडिओचे गिफ्स कसे बनवता येतील हे देखील पहा इथे अगदी स्टेप बाय स्टेप !

व्हॉट्सअ‍ॅप वर व्हिडिओचा GIF कसा बनवायचा?

  • व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओचा GIF बनवण्यासाठी तुम्हांला ज्या व्यक्तीला तो पाठवायचा आहे त्याचा कॉन्टॅक्ट व्हॉट्सअ‍ॅपवर उघडायचा आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप उघडल्यानंतर गॅलेरीमधून व्हिडिओ सिलेक्ट करा.
  • व्हिडिओमधून ज्या टाईमलाईनसाठी तुम्हांला जिफ बनवायची आहे तेवढी सिलेक्ट करा.
  • त्यानंतर उजव्या बाजूला GIF चा पर्याय दिसेल.
  • इतर फाईल ज्या स्वरूपात पाठवली जाते त्या स्वरूपातच जिफ देखील पाठवा.

अ‍ॅन्ड्रॉईड प्रमाणेच तुमच्या अ‍ॅपल आयफोनमध्येही व्हिडिओचे जिफ पाठवणं शक्य आहे.

फोटोंचा वापर करून तुम्हांला जिफ बनवू पाठवायचा असेल तर तुम्हांला जिफ बनवण्यासाठी फोटो सिलेक्ट करावे लागतील. त्यानंतर उजव्या बाजूला जिफचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमच्या सिलेक्ट केलेल्या फोटोंचा जिफ तयार होईल. हा देखील तुम्ही सहज पाठवू शकता.