Instagram & Facebook (Photo Credits: File Photo)

फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) हे दोन लोकप्रिय अॅप असून साधारण जगभरातील कोट्यावधी लोक याचा वापर करतात. त्यापैकी काही जणांना इंग्रजी भाषेतील कन्टेट वाचायला आवडतो. तर काही युजर्स आपल्या देशातील भाषेत कन्टेटचा आस्वाद घेणे पसंत करतात. त्यामुळे हे ग्लोबल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेगवेगळ्या भाषांमध्ये कन्टेट ऑफर करतात. उदा. हिंदी, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, अरेबिक, चायनीज, पोर्तुगिज आणि अन्य. विशेष म्हणजे फेसबुक 8 भारतीय भाषां सपोर्ट करतं. (How to Repost a Story on Instagram: इंस्टाग्रामवर स्टोरी रिपोस्ट कशी कराल? फॉलो करा '6' सोप्या स्टेप्स)

फेसुबक आणि इंस्टाग्रावर तुम्हाला तुमच्या आवडीची भाषा निवडायची असेल, तर काय कराल? अगदी सोपे आहे. काही सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही Language Settings बदलू शकाल. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अकाऊंट ओपन करताना भाषा निवडीचा पर्याय दिसतो. त्यावेळेस जर तुम्ही इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेची निवड केली असेल आणि आता तुम्हाला ती सेटिंग बदलायची असेल तर या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

इंस्टाग्रामवर Language Settings कशी बदलाल?

# इंस्टाग्राम ओपन करा. तुमच्या प्रोफाईलवर उजव्या बाजूला खाली असणाऱ्या युजर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.

# उजव्या बाजूला वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि 'Settings' हा पर्याय निवडा.

# 'Settings' खाली असलेल्या 'Account' वर क्लिक करा आणि Language हा पर्याय निवडा.

# Language पर्यायाखाली जगातील विविध भाषा तुम्हाला दिसतील त्यातील तुम्हाला हवी असलेली भाषा तुम्ही निवडू शकता.

फेसबुकवर Language Settings कशी बदलाल?

# फेसबुक ओपन करा आणि उजव्या बाजूला वर असलेल्या तीन लाईन बटणावर क्लिक करा. त्यानंतर 'Settings & Privacy' हा पर्याय निवडा.

# 'Settings & Privacy' खालील 'Language' पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.

तुम्हाला पुन्हा भाषा बदलायची असल्यास याच स्टेप्स फॉलो करुन तुम्ही बदलू शकता. त्यानंतर लगेचच पेज तुम्हाला त्या भाषेत दिसू लागले.