How to Repost a Story on Instagram: इंस्टाग्रामवर स्टोरी रिपोस्ट कशी कराल? फॉलो करा '6' सोप्या स्टेप्स
Instagram logo (Picture Credits: instagram.com)

फोटो आणि व्हिडिओ शेअरिंसाठी इंस्टाग्राम (Instagram) हे सोशल माध्यम अत्यंत लोकप्रिय आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच इंस्टाग्रामची या सोशल साईटची भूरळ पडली आहे. आपले खास फोटोज, व्हिडिओज शेअर करुन युजर्स इंस्टाग्रावर अॅक्टीव्ह असतात. कोट्यावधी लोकं या माध्यमांचा वापर करुन स्टोरी (Story), व्हिडिओ (Video) शेअर करत असतात. पण जेव्हा दुसऱ्या कोणाची स्टोरी किंवा व्हिडिओ तुमच्या स्टोरीवर वर शेअर करायचा आसतो. तेव्हा काहीसे अवघड जाते. यासाठी दोन मार्ग आहेत. जाणून घेऊया, इंस्टाग्रावर स्टोरी रिपोस्ट (Repost) नेमकी कशी करायची:

# तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट ओपन करा आणि पोस्टखाली असलेल्या शेअर आयकॉनवर क्लिक करा.

# त्यानंतर Add Post to Your Story या पर्यायावर क्लिक करा.

# Send to आणि Share against Your Story वर क्लिक करा.

ज्या युजर्सनी पोस्टवर तुम्हाला शेअरींचा पर्याय दिसत नाही. अशा युजर्सचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. मात्र त्यासाठी तुम्हाला त्या युजरची परवानगी घ्यावी लागेल. (इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या कशी वाढवाल? जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स)

1. इंस्टाग्राम ओपन करा. तुम्ही रिपोस्ट करु इच्छित असलेल्या व्हिडिओ आणि पोस्टवर जा आणि तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Copy Link हा पर्याय निवडा.

2. त्यानंतर ingramer.com वर जा. टूल सेक्शनमधून Hamburger आयकॉनवर क्लिक करा आणि मग 'Instagram Downloader या पर्यायावर क्लिक करा.

3. 'Download Video' किंवा 'Download Photo' याखाली कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.

4. सर्च बटणावर क्लिक करा, स्कोल डाऊन आणि पोस्ट डाऊनलोड करा.

5. पोस्ट डाऊनलोड केल्यानंतर इंस्टाग्रामवर जा आणि कॅमेरा बटणावर क्लिक करुन फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा.

6. मग Send to वर क्लिक करा. Share पर्यायावर क्लिक करुन तुम्ही ती पोस्ट किंवा व्हिडिओ तुमच्या स्टोरीवर अपलोड करु शकता.

तसंच तुम्ही तो फोटो, पोस्ट हवी तशी एडीट करु शकता. बॅकग्राऊंट कलर बदलून, कस्टम फॉन्ट, ड्राप शॅडो हे पर्याय वापरु तुम्ही ती पोस्ट नवी करु शकता. GIFs च्या मदतीने इंस्टाग्राम पोस्ट अधिक मजेशीर होतील.