Android स्मार्टफोन्सवर WhatsApp वरील चॅट चे बॅकअप किंवा रिस्टोर कसे कराल, पाहा सोप्या ट्रिक्स
Whatsapp Chat (Photo Credits: PixaBay)

सध्याचे जग सोशल मिडियामय झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यात आपल्या सोबत किंवा आपण ज्याच्या सोबत 24x7 असतो, तो अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅप अॅप (WhatsApp) हा देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलाय. सुरुवातीला व्हॉट्सअॅप हा केवळ चॅट पुरता आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत संभाषणापुरता वापरला जायचा. मग जसे जसे हे अॅप अपडेट होत राहिले ज्यात ग्रुप बनवणे, व्हॉईस चॅट, व्हिडिओ कॉल करणे असे फिचर्स येत गेले तसतसे लोक दैनंदिन संभाषणाबरोबर आपल्या कामासाठी याचा वापर करु लागले. ऑफिस मध्ये कर्मचा-यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवणे, शाळेत जाणा-या मुलांच्या पालकांनी आपला ग्रुप बनवून शाळेसंबंधा माहिती बनवणे असे ब-याच गोष्टी वाढू लागल्या.

त्यामुळे अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू लागली. मात्र कधी कधी स्मार्टफोनमधील काही तांत्रिक अडचणीमुळे आपले हे महत्त्वाचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) करप्ट होण्याची, रिमूव्ह होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून अॅनड्राईड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चॅट चा कसे बॅक अप घ्यावा अथवा ते कसे रिस्टोर करावे याच्या सोप्या स्टेप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हॉट्सअॅप चॅट चे बॅकअप कसे घ्याल:

1. तुमच्या अॅनड्रॉईड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप उघडा आणि त्याच्या वरच्या उजव्या बाजूला कोप-यात 3 टिंब दिसतील तेथे टॅप करा.

2. नंतर सेटिंग्स वर क्लिक करा मग आणखी ऑप्शन्स दिसतील त्यातील चॅट पर्यायावर क्लिक करा

3.नंतर आणखी पर्याय दिसतील त्यातील चॅट बॅकअप या पर्यायावर टॅप करा.

4. गुगल ड्राइव सेटिंग्समधील बॅकअप टू गुगल ड्राइव या पर्यायावर क्लिक करा.

5. त्यातील बॅकअप फ्रिक्वेन्सी निवडा

6. त्यानंतर बॅकअप ओव्हर पर्यायामधून त्यातील तुम्ही बॅकअप पर्याय निवडू शकता. ज्यात तुम्हाला बॅकअप तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा मोबाईल वायफाय ला कनेक्ट असेल किंवा नसेल असे दोन पर्याय मिळतील.

7. तसेच तुमचे व्हॉट्सअॅप व्हिडिओज सेव्ह राहण्यासाठी तुम्ही व्हिडिओज पर्यायही निवडू शकता.

8. सर्वात शेवटी तुम्ही बॅकअप चॅट पर्याय निवडा जेणे करुन तुमचे सर्व चॅट गुगल ड्राइवमध्ये सेव्ह होईल.

व्हॉट्सअॅप चॅट रिस्टोर कसे कराल:

जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन बदलता आणि त्यात व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. व्हॉट्सअप अॅप तुमच्या नवीन स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरने व्हॉट्सअप अॅप उघडा. त्यानंतर तुम्हाला रिस्टोर ऑप्शन येईल. त्या रिस्टोर वर क्लिक केल्यानंतर खालील स्टेप्स वापरा:

हेही वाचा- Whatsapp मध्ये येणार एक जबरदस्त फीचर, जे सांगेल एक मेसेज किती वेळा झाला आहे फॉरवर्ड

1. तुमच्या गुगल ड्राइवमधून तुमचे व्हॉट्सअॅप चॅट रिस्टोर करा. त्यानंतर Continue पर्यायावर क्लिक करा.

2. त्यानंतर गुगल ड्राइवमधील बॅकअप तपासण्यासाठी Give Permission वर टॅप करा

3. त्यानंतर ज्या अकाउंटमध्ये तुमचे व्हॉट्सअॅप बॅकअप आहे तेथे क्लिक करा

4. रिस्टोर वर टॅप करा. तुमचे सर्व व्हॉट्सअॅप चॅट रिस्टोर होईल.

या अगदी सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप चॅट रिस्टोर करता येईल किंवा त्याच बॅकअप घेता येईल. या पद्धतींमुळे आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप चॅट करप्ट होण्याची, रिमूव्ह होण्याची चिंता करण्याची गरज नाही.